राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी भाजपसोबत घरोबा केला. यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडल्या. असे असताना आता शिंदे गट आपली ताकद वाढवत असून उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्यांना डावलले गेले अशांना पुन्हा एकदा सभागृहात आणणार असल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये आता कोकणात उद्धव ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचे फायर ब्रँड नेते अशी खास ओळख असलेले रामदासभाई कदम (Ramdas Kadam) यांचे नाव राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत विधानपरिषद सदस्यपदासाठी निश्चित करण्यात आले आहे.
राज्यपालांकडे आता ही यादी गेल्यावर राजभवनकडुन नावे जाहीर झाल्यास शिंदे फडणवीस सरकारचे विधानपरिषदेत बारा आमदारांचे संख्याबळ वाढणार आहे. यामुळे यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. रामदास कदम यांचे नाव या यादीत फिक्स मानले जात आहे.
ऊसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्याने हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड
त्यांना अनेकदा डावलले गेले असल्याचे त्यांनी उघडपणे सांगितले आहे. ते मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून गेले १२ वर्षे विधानपरिषद सदस्य होते. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांचा ठाकरे कुटूंबाशी असलेला वाद वाढतच गेला.
'दररोज संध्याकाळी 2 क्वार्टर दारु आणि 4 किलो मटण खाणारा गद्दार आमदार'
यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडुन त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नव्हती. याचदरम्यान खेड येथील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी 'रामदासभाई तुमची सेकंड ईनिंग जोरदार सुरू करा', असे म्हणत त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याचे एकप्रकारे जाहीर केले होते.
महत्वाच्या बातम्या;
शिंदे-फडणवीस सरकारची राज्यपाल नियुक्त १२ नावांची यादी समोर, वाचा कोणाची लागणार वर्णी?
Milk FRP; दुधाला एफआरपी लागू करण्यासाठी किसान सभा होणार आक्रमक, घेतला मोठा निर्णय
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय, आणि विद्यार्थी लटकून नदी पार करत आहेत
Share your comments