यावर्षी कापसाचे अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे मागणीच्या मानाने पुरवठा सातत्याने कमी होत असून कधी नव्हे एवढा दर कापसाला मिळत आहे. त्यामुळे तरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे
परंतु कापसाच्या या वाढत्या दराबाबत वसंत उद्योगामध्ये कमालीचे चिंताग्रस्त असे वातावरण आहे. आता वस्त्रोद्योग लॉबीने कापसाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.त्यासाठीवस्त्रोद्योग लॉबीने दर कमी करण्यासाठी निर्यात बंद करावी तसेच आयात शुल्क कमी करावी अशा मागण्या केल्या आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
कापसाचे दर नियंत्रणात राहण्यासाठी वस्त्रोद्योग कडून आणि पर्यायांचा वापर करण्यात येत आहे त्यातीलच म्हणजे तमिळनाडू राज्यातील कोईमपुरात मोठ्याप्रमाणात वस्त्रोद्योग आहे.तेथील उद्योगांनी कापसाचे दर नियंत्रणात आणावे या मागणीसाठी आपले उद्योग 17 ते 18 जानेवारीला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या लॉबीकडून वेगळ्या पद्धतीने सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. कापसाच्या वाढत्या दराबाबत या क्षेत्रातील उद्योजकांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे मागणी केली होती.
परंतु शेतकऱ्यांचा बाबतीत असलेल्या कोणत्याही मुद्द्यावर हस्तक्षेप केला जाणार नसल्याचे यावेळी सुनावण्यात आल्या आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून दरवाजे बंद झाल्याने आता कोईमतूर टेक्स्टाईल असोसिएशनच्या वतीने केंद्रीय वस्त्रोद्योग केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांना कापसाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी चे निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळेच पियुष गोयल यासंदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Share your comments