1. बातम्या

आसाममध्ये भयानक पूर; १.१५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

आसाममध्ये ब्रम्हपूत्रा आणि तिच्या उपनद्यांना आलेल्या भयानक पुरामुळे आसामधील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, जवळजवळ १.१५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

KJ Staff
KJ Staff


आसाममध्ये ब्रम्हपूत्रा आणि तिच्या उपनद्यांना आलेल्या भयानक पुरामुळे आसामधील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, जवळजवळ १.१५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले  आहे.  गेल्या दिवसांपासून तेथे पावसाने थैमान घातले असून तेथील नद्यांना आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. यात शेती क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांना पूर येणे हे कायमचे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप  नुकसान सोसावे लागते. यावर्षी मात्र शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने भाताच्या पीक हा समावेश आहे.  ब्रह्मपुत्रा हि नदी सध्या  धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.  या पुराचा फटका जवजवळ २५०० गावांना बसला आहे. तसेच ८९ लोक मृत्युमुखी पावले  आहेत.

आसाम सरकारच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरणानुसार  धेमाजी, लखीमपूर, बकसा, नलबारी, चिरांग, कोक्राझार, धुब्री, गोलपारा, नागाव, गोलाघाट या जिल्ह्याना पुराचा फटका बसला आहे.आसाम हा मूळ  कृषिप्रधान राज्य आहे. चहा आणि  भात हि सर्वात महत्वाची पिके आहेत. दरवर्षी  ब्रम्ह्पुत्रेला  येणाऱ्या  पुरामुळे खूप मोठया प्रमाणात क्षेत्र पाण्याखाली जाते. दरवर्षी नदी  आपला मार्ग बदलते.त्यामुळे  शेतीखालील क्षेत्र  कमी होत आहे.

English Summary: Terrible floods in Assam; Crop damage on 1.15 lakh hectares Published on: 23 July 2020, 06:57 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters