1. बातम्या

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली: पी एम किसान चा दहावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणारा एक जानेवारीला

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही होय. आपल्याला माहित आहेच कि या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातात

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
Pm kisaan samman nidhi yojana

Pm kisaan samman nidhi yojana

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही होय. आपल्याला माहित आहेच कि या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातात

आज पर्यंत या योजनेअंतर्गत नऊ हपत्याचे वितरण करण्यात आले आहे. पुढील दहावा हप्ता एक जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत एकूण दहा  कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित  करण्यात येणार आहेत.

आतापर्यंत या योजनेअंतर्गत 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले असून ई केवायसी न केल्यावरही हप्ता मिळणार आहे. परंतु मार्च 2022 नंतर लाभ  मिळवायचे असतील तर मार्च 2022 पर्यंत ई केवायसी करणे गरजेचे आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील जवळजवळ अकरा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे.

मागे या योजनेत अनियमितता झाल्याचे आढळून आल्याने शासनाने कडक पावले उचलीत अशा शेतकऱ्यांकडून दिली गेलेली रक्कम परत घेतली आहे. जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर या योजनेअंतर्गत जवळ जवळ एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी सांगितलेले आहे.

English Summary: Tenth installment of pm kisaan collect in farmer account at one january Published on: 30 December 2021, 01:51 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters