संत्रा लागवडीच्या क्षेत्रात हरिणांनी शिंगाने नवीन लावलेल्या कलमांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केलेले आहे.शेतकऱ्यांचे नुकसान करण्याची,जणू एक नवीन पद्धतच शोधून काढली असे म्हणायला हरकत नसावी.
अकोट तालुक्यातील एदलापूर,खैरखेड,चोरवड,शिवपूर-बोर्डी या शिवरामधील संत्रा लागवडीच्या क्षेत्रात तुफान धुमाकूळ घातलेला आहे.तसेच खरीप पिकाच्या काढण्या जवळ-जवळ आटोपल्यामुळे रान खुले झालेत आणि हा त्रास दिवसेदिवस वाढतच आहे.रात्री-बेरात्री नवीन बागेत शिरून हे प्राणी आपले शिंग कलमांवर्ती घासतात त्यामुळे भर उन्हात त्या कलमा वाळून जातात त्यानंतर त्यावरती कुठलीही उपाय योजना काम देत नाही.
नाईलाजाने शेतकऱ्यांचा झाडाचा जीव विना कारणाने जातो.त्यामुळे सर्व काम धंदे सोडून फक्त शेतातच बसून राहायचं का,असा संभ्रम शेतकर्यांमध्ये निर्माण झालेला आहे.अनेक शेतकरी यामुळे रात्री जागरणाला जात असतात दिवसाला सुद्धा शेतात दबा धरून बसावेच लागते,परंतु तरीही एखाद्या वेळी हरणांची टोळी शेतात शिरतच असते आणि एकदा शिरल्यानंतर 10-15 झाडाचा बळी हा ठरलेलाच असतो.
त्यामुळे अनेक संत्रा उत्पादकांमध्ये खूप असंतोष पसरलेला आहे.यामुळे अनेक संत्राउत्पादक शेतकऱ्यांनी शहानुर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तक्रारी दिल्या आहेत.प्रचंड रोष व्यक्त करत अनेक संत्राउत्पादकांनी नुकसानभरपाई ची मागणी केली आहे.
Share your comments