1. बातम्या

एकनाथ शिंदेंसाठी टेन्शन वाढले, गटातले ४ आमदार नाराज झाले तरी सरकारचा खेळ खल्लास!

मुंबई: राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यामध्येच अनेक आमदार नाराज असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी अजुणही आमदारांना शिवसेनेची दारे खुली असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढू शकते.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
CM Eknath shinde

CM Eknath shinde

मुंबई: राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकारचा (Shinde Fadnavis Government) पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यामध्येच अनेक आमदार (MLA) नाराज असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी अजुणही आमदारांना शिवसेनेची (Shivsena) दारे खुली असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढू शकते.

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रखडण्याची शक्यता आहे. मात्र शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये मंत्रिपदावरून नाराजी दिसत आहे. शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमचीच शिवसेना असल्याचे म्हंटले आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात गेले आहे. मात्र कोर्टाने यावर अद्याप निर्णय दिलेला नाही.

दुसऱ्या टप्प्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जर काही आमदार शिवसेनेत गेले तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार (Defection Act) शिंदे गट अडचणीत येऊ शकतो. याचीच भीती एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सतावत आहे.

Electric Car: महिंद्राची जबरदस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही कार या महिन्यात होणार लॉन्च; सिंगल चार्जमध्ये 400 किमी धावणार

शिंदे गटाला कायदेशीर फूट दाखवायची असेल तर एकूण आमदारांपैकी ३७ आमदारांची गरज आहे. असे झाल्यास शिंदे गटाचे काम आणखी सोपे होईल कारण अपात्रतेची कारवाई टाळता येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ऐकवून ४० आमदार आहेत. यापैकी ४ आमदार जरी शिवसेनेत गेले तरी शिंदे गट अडचणीत येऊ शकतो.

"सध्या सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर खरी शिवसेना कोणती, असा वाद सुरु आहे. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदारांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गटाची वाट धरली, तर खऱ्या-खोट्या शिवसेनेचा संपूर्ण डोलाराच कोसळेल. कारण शिंदेंचा दावाच कमकुवत ठरेल" असं मत शिंदे गटातील एका सदस्याने व्यक्त केले आहे.

आमच्या कमळाला बाई म्हणता, तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला पेंग्विनसेना म्हणायचं का?

सध्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील ४० पैकी फक्त ९ आमदारांना मंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे आणखी ३० आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेणे आवश्यक आहे. मात्र मित्रपक्षातीलही ९ आमदारांना मंत्रिपद मिळाले आहे. मात्र मित्रपक्षाच्या आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे भाजप दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात जास्त जागा घेऊ शकतो.

त्यामुळे शिंदे गटातील ५ ते जास्तीत जास्त १० आमदारांना मंत्रिपद मिळू शकते. बाकी आमदारांना मंत्रिपदाशिवायचं राहायला लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:
ठाकरे-शिंदे गटाच्या दसरा मेळावा मैदान वादात शरद पवारांची उडी; म्हणाले, मेळावा घेण्याचा अधिकार...
LPG Price: गॅसच्या किमती 5 वर्षात किती वाढल्या? आकडा ऐकून तुम्ही व्हाल हैराण...

English Summary: Tension increased for Eknath Shinde, 4 MLAs group were upset Published on: 03 September 2022, 05:02 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters
News Hub