राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४२. अंश सेल्सिअस तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान आज राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील काही भागात तापमान वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान दुपारनंतर ढगाळ हवामान होऊन वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. कोकण वगळता राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी उन्हाच्या चटका वाढला आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव, अकोल्यासह धुळे, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, अमरावती, बह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, येथे तापमान चाळीशीपार होते. दरम्यान उन्हाचा ताप आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. रविवारीही उस्मानाबाद जिल्ह्यात आणि परभणी जिल्ह्यात पाऊस पडला होता. उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे सोमवारी सायंकाळी गारांचा पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. देशाच्या इतर भागात ही तापमान वाढलेले दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून मध्य भारतातील तापमान वाढले आहे. मध्यप्रदेशातही सूर्य कोपल्याचे चित्र दिसत आहे. तेथील तापमान ४५ अंश सेल्सिअस होते. गुजरातमध्ये तापमान वाढू लागले आहे.
राज्यातील तापमान - पुणे ३९.१, जळगाव ४२.६, धुळे ४१.८ कोल्हापूर ३७.५, महाबळेश्वर ३१.२ नाशिक ३९.२, निफाड ३९.२, सांगली ३८.२, सातारा ३८.९, सोलापूर ४०.८, डहाणू ३४.५, सांताक्रुझ ३५.७, रत्नागिरी ३२.८, औरंगाबाद ३९.७, बीड ४१.१, परभणी ४१.०, नांदेड ४०.० , अकोला ४२.८, अमरावती ४१.६, बुलडाणा ३८.८, बह्मपुरी ४०.२, चंद्रपूर ४०.५, गोंदिया ३९.८, नागपूर ४१.१, वर्धा ४१.६
Share your comments