1. बातम्या

तहसीलदार साहेब यांना फोन द्वारे संवाद साधून ओला दुष्काळ जाहीर

गिरडा:- गिरडा व मासरूळ जिल्हा परिषद सर्कल अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्याच्या शेतीची केली पाहणी. गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने गिरडा,मासरूळ जिल्हा परिषद सर्कल व संपूर्ण बुलढाणा तालुक्यात शेतकऱ्याच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
जाहीर करण्याबाबत व शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत बाबतीत केली मनोजभाऊ दांडगे यांनी चर्चा

जाहीर करण्याबाबत व शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत बाबतीत केली मनोजभाऊ दांडगे यांनी चर्चा

शेतकऱ्यांप्रति सामाजिक आस्था ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल बुलढाणा मनोजभाऊ दांडगे यांनी आज दि 07/09/2021 वार मंगळवार रोजी गिरडा व परिसरातील शेतकऱ्याच्या शेती पिकाचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली.

          गिरडा गावातील शेतकरी तुलेंद्र गायकवाड,रवींद्र आण्णा गायकवाड, अनिल गायकवाड,माजी सरपंच सुनिल भाऊ गायकवाड ,गजानन गायकवाड,सुरेश अप्पा गायकवाड यांच्या शेताची तसेच सुरेश भाऊ गायकवाड व संतोष भाई गायकवाड यांच्या होस्टेन गायी ची सुद्धा पाहणी केली,वरील शेतकऱ्याकडे 40 गायी असून बुलढाणा तालुक्यात एक उत्तम व्यवसाय ते करतात त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानाची मा मनोजभाऊ दांडगे यांनी पाहणी केली व तात्काळ प्रशासकीय यंत्रणा कामाला लावून

तहसीलदार साहेब यांना फोन करून बुलडाणा तालुक्यातील पाडळी, गिरडा गोंधनखेड,इजलापूर,मढ गावासह पूर्ण मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मधील संपूर्ण गावे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मा.तहसीलदार साहेब यांच्याशी सुद्धा फोन वर चर्चा केली.यावेळी गिरडा येथील ज्ञानेश्वर गायकवाड,मदन टेलर,डॉ थोरात, मनिष गायकवाड,गणेश गायकवाड, सुरेश भाऊ गायकवाड ,अशोक अप्पा गायकवाड उपस्थित होते.

       निश्चितच शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले आहे.एक सामाजिक बांधिलकी म्हणून मनोजभाऊ स्वतः सत्ता नसताना देखील नेहमी शेतकऱ्याच्या प्रश्नावर न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असतात.निश्चितच जिल्ह्याचे पालकमंत्री एक पालकत्व स्वीकारून सध्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देतील व सर्वतोपरी पाठपुरावा करून मनोजभाऊ दांडगे शेतकऱ्याप्रति नेहमीप्रमाणे ठामपणे उभे राहून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासन मार्फत प्रयत्न करतील.

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: Tehsildar Saheb communicates by phone and declares wet drought. Published on: 09 September 2021, 07:14 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters