1. बातम्या

तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईपोटी नाशिक जिल्ह्यास 9.37 कोटी निधी जाहीर, विभागास 10.47 कोटींची मदत

KJ Maharashtra
KJ Maharashtra
taukte compansation

taukte compansation

 मागच्या महिन्यात कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रात सह संपूर्ण राज्याला तौक्ते चक्रीवादळाचा प्रचंड प्रमाणात तडाखा बसून प्रचंड प्रमाणात शेती आणि फळबागांचे नुकसान झाले होते. या चक्रीवादळाने नाशिक जिल्ह्याला हि झोडपून काढले होते. या चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यातही प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

 नुकसानभरपाई पोटी नाशिक जिल्ह्यात नऊ कोटी 36 लाखांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. तसेच नाशिक विभागास दहा कोटी 47 लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तौक्ते चक्रीवादळ या महिन्याच्या 16 आणि 17 मे रोजी अरबी समुद्र आणि कोकणच्या किनारपट्टी सह महाराष्ट्राच्या अनेक भागात पोचले होते. या चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान कोकण  किनारपट्टीचे झाले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आधी कोकण किनारपट्टी तीन जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते पाऊस प्रचंड झाला होता.

 तसेच उत्तर महाराष्ट्राला देखील या वादळाचा प्रचंड तडाखा बसला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात त्याचा फटका बसून अधिक नुकसान झाले होते. नाशिक विभागाचा विचार केला तर विभागाच्या तुलनेत हे नुकसान 90  टक्क्यांहून अधिक आहे. तसेच या वादळाचा तडाखा अमरावती, पुणे औरंगाबाद विभागाला देखील बसला होता. तिथे घराचे पूर्ण काही ठिकाणी अंशतः पडझड झाली. तसेच पशुधनाचे अतोनात नुकसान झाले होते. आंबा, सुपारी,पोफळी, डाळिंब व द्राक्ष बागा आडव्या झाल्या. तसेच इतर पिके व भाजीपाला देखील प्रचंड नुकसान झाले होते.

 

या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी संबंधित जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांनी त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवले होते. या संपूर्ण शासकीय प्रक्रियेला एक महिना गेल्यानंतर नुकसानीच्या निकषांनुसार शासनाने 170 कोटी 72 लाखाची मदत संपूर्ण राज्यासाठी दिली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यासाठी नऊ कोटी 37 लाख आणि नाशिक विभागासाठी म्हणजेच धुळे, नंदुरबार, नगर आणि जळगाव या सर्वांना मिळून दहा कोटी 57 लाख रुपये शासनाकडून मिळाली आहेत. ही प्राप्त रक्कम सर्व जिल्ह्यांमधील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या संबंधित बँक खात्यावर त्वरित वर्ग करण्याचे हाती जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters