1. बातम्या

येणाऱ्या दहा वर्षात कृषी प्लांट मॅकॅनिझशनला दुप्पट करण्याचे लक्ष्य- नरेंद्रसिंह तोमर

KJ Maharashtra
KJ Maharashtra

केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण, ग्रामीण विकास, पंचायतराज आणि फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचे मंत्री केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सोमवारी म्हटले की, 95 टक्के कृषी यंत्र( डिवाइस) देशातच तयार केले जात आहेत. आणि शेती क्षेत्राच्या विकासासाठी दहा वर्षाच्या आत प्रति हेक्टर मॅकॅनिझशन दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशात व्होकल  फोर लोकल याबाबत उत्साहाचं वातावरण आहे. त्याच्यातच कृषी यांत्रिकीकरण हे क्षेत्र अगोदर पासून स्थानिक उत्पादन करण्यामध्ये पुढे आहे आणि जवळ 95% यंत्र हे देशातच तयार होतात.

देशातील जवळजवळ 86 टक्के शेतकऱ्यांची उत्पन्न वाढेल:

ट्रॅक्टर अँड मॅकॅनिझशन असोसिएशन(टी एम ए ) च्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री तोमर यांनी फार्म मशिनी करण या विषयावर म्हटले की, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत महागडे आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीयुक्त कृषी यंत्र शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचवण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे. त्यांनी असोसिएशनच्या सदस्यांना छोट्या शेत्रातील शेतकऱ्यांसाठी छोट्यातील छोटी उपयोगी मशीन उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह केला कारण त्याचा फायदा देशातील 86% छोटे शेतकरी घेऊ शकतील आणि त्यांचे उत्पादनात वाढ होईल.

हेही वाचा:सरकारच्या नवीन योजनेनुसार वर्षाला वाढणार 55 हजार पेक्षा जास्त उत्पन्न

त्यांनी बोलताना म्हटले की सबमिशन ऑन अग्रिकल्चर मॅकॅनिझशन योजना देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे. कारण कृषी यांत्रिकीकरणाला चालना मिळावी आणि शेती क्षेत्रातल्या उत्पादनात वाढ व्हावी. तोमर यांनी पुढे म्हटले भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत महागडे आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी युक्त कृषी यंत्र उपलब्ध करण्यासाठी सरकार या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. व्यक्तिगत शेतकऱ्याला या योजनेच्या माध्यमातून 40 टक्के सबसिडी मिळते. तसेच शेतकरी गटांना प्रकल्पाच्या 80 टक्के पर्यंत सबसिडी दिली जाते. त्याची जास्त किंमत दहा लाख रुपये पर्यंत आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters