MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

Talathi Bharti Exam : '२०० पैकी २१४ गुण म्हणजे भाजपचे ४८ पैकी ६० खासदार निवडून येण्यासारखे'

या प्रकरावर टीका झाल्यानंतर महसूल विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी महसूल विभागाने सांगितले की, संबंधित विद्यार्थाला २०० पैकी २१४ गुण मिळाल्याचा कुठलाही गैरप्रकार घडला नसून हे केवळ गैरसमजुतीतून घडलं आहे, असा खुलासा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.

Talathi Bharti Exam News

Talathi Bharti Exam News

Talathi Bharti Update News : राज्य सरकारने सरळसेवा पद्धतीने तलाठी भरती प्रक्रिया घेतली आहे. पण या भरती प्रक्रियेत घोटाळा किंवा गोंधळ झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे शेतकरी नेते, विरोधक आणि विद्यार्थ्यांकडून सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. तलाठी भरतीचा पेपर २०० गुणांचा असून एका विद्यार्थ्याला २१४ गुण दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या परिक्षेत गोंधळ झाल्याचे समोर आल्याने सरकार विरोधात टीकेची झोड उठली आहे.

या प्रकरावर टीका झाल्यानंतर महसूल विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी महसूल विभागाने सांगितले की, संबंधित विद्यार्थाला २०० पैकी २१४ गुण मिळाल्याचा कुठलाही गैरप्रकार घडला नसून हे केवळ गैरसमजुतीतून घडलं आहे, असा खुलासा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.

या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून टीकास्त्र सोडलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, "राज्य सरकारने सरळसेवा पध्दतीने तलाठी भरती प्रक्रियाच्या परिक्षा घेण्यात आल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास आले आहे. परिक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना २०० मार्कच्या पेपरला २१४ मार्क पडले असल्याचे प्रकार समोर आल्याने तलाठी भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असून यामुळे हुशार, होतकरू व सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आहे असे जर सरकारचे म्हणणे असेल तर या निकालपत्रातील २०० पैकी १२५ पेक्षा जादा गुण ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची एमपीएससी परिक्षा घेऊन पात्रता सिध्द करण्यास संधी द्यावी. जर यामध्ये हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उतीर्ण झाले तर विद्यार्थ्यांचा सरळसेवा भरती प्रक्रियेवर व शासनावर विश्वास बसेल."

आमदार रोहीत पवार यांनी याबाबत ट्विट करत सरकारवर निशाना साधला आहे. पवारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, २०० गुणांच्या तलाठी परीक्षेत २१४ मार्क पडणे म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे ४८ पैकी ६० खासदार निवडून येण्यासारखे आहे. तलाठी भरतीचा हा निकाल पाहून ‘भाजपा सरकार है तो मुन्कीन है’ असंच म्हणावं लागेल.तलाठी भरतीत अनेक ठिकाणी पेपरफुटीच्या देखील #FIR दाखल झाल्या, पण या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केलं. तलाठी भरतीत एकेका जागेसाठी २५ लाखाहून अधिकची वसुली झाली. सरकार, अधिकारी, परीक्षा घेणारी कंपनी असे सर्वच यात सहभागी असून जवळपास १५०० कोटीहून अधिकचा हा घोटाळा आहे. केवळ काही कोटींच्या लाचेसाठी वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या लाखो युवांच्या, त्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नांचा खून करण्याचं पाप या सरकारने केलं आहे.

राज्यात एकही परीक्षा पारदर्शकपणे पार पडलेली नाही. विद्यार्थ्यांनी अनेकदा आवाज उठवला, परंतु हे चोर-गद्दारांचं निकामी सरकार मात्र आपल्या सत्तेच्या मस्तीत गुंग आहे. पेपरफुटी विरोधात कडक कायदा करण्यासंदर्भात सरकार एवढं उदासीन का? याचं उत्तर आज मिळालं. सत्तेची एवढी मस्ती योग्य नाही हे सरकारमधील त्रिकुटाने लक्षात घ्यावं.

English Summary: Talathi Bharti Exam 214 out of 200 marks means 60 out of 48 MPs of BJP will be election raju shetti rohit pawar Published on: 08 January 2024, 05:33 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters