Satara News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात आहेत. यावेळी शिंदे शेतीत रमल्याचे दिसून आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी यांत्रिकीकरण्याच्या साहाय्याने हळद पिकाची कोळपणी केली आहे. राजकारणातून वेळ काढून ते शेतातील कामांमध्ये व्यस्त झाल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतात जाऊन मशागतीचे काम केले आहे.
दरे गावात मुख्यमंत्री शिंदे यांची शेती आहे. त्याच्या शेतात विविध पिके घेतली जातात. सध्या आंबे, हळद, बांबू, चिकू, सफरचंद, पपई अशी विविध पिके आहेत. तसंच जेव्हा गावी येतो तेव्हा आपोआप पाय शेतीकडे वळतात, असं मुख्यमंत्री शिंदे सांगतात.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेती आणि मातीशी माझी नाळ आहे. शेती काम करण्याचा वेगळाच आनंद आहे. जेव्हा जेव्हा मी गावी येतो, तेव्हा तेव्हा शेतीची कामे करण्यासाठी मी वेळ काढतो.
बांबू लागवडीचा मोठा प्रकल्प राज्यभरात मुख्यमंत्री शिंदे यांनी हाती घेतला आहे. एका व्यक्तीस लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा जास्त वायू बांबू देतो. सर्वच दृष्टीने बांबू लागवड फायदेशीर असल्यामुळे हा प्रकल्प घेतला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबू पासून अनेक उत्पादने घेता येतात यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तरी राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बांबू लागवड करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरे तालुका महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते बांबू लागवड करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
Share your comments