कृषी मंत्रालयाने सरकारकडून प्रधानमंत्री फसल बिमा योजना, पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल केले आहेत. या बदलामध्ये खरीप पीक विमा २०२० पासून लागू करण्यात आले आहेत. यानुसार, कृषी कार्डधारक शेतकरी आपल्या पिकांचा विमा स्वता च्या इच्छेने करू शकणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना २०२०-२१ साठी पीक विमा करायचा नसेल त्यांनी २४ जुलैपर्यंत संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन तेथे ओप्ट आउट फॉर्म भरावा असे उपायुक्त डॉ. नरहरि सिंह बांगड यांनी सांगितले.
पंतप्रधान पीक विमा योजनेविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी जिल्हा कृषी किंवा शेतकरी कल्याण विभाग कार्यालयात मिळू शकते. पीक विमा करणाऱ्या शेतकऱ्यांना हे माहिती करुन घ्यावे की, बँक खात्यात पीक विमा हप्त्यासाठी त्यांच्या बँक खात्यात पुरेसा पैसा आहे किंवा नाही. बऱ्याचवेळा असे होते की, शेतकऱ्यांच्या कृषी कार्ड खात्यात पुरेशी शिल्लक नसते. यामुळे त्यांचा विमा लागू होत नाही. कृषी कार्डधारकांना निर्धारित वेळेत आपल्या कार्डमध्ये पुरेसे पैसे आहेत, याची माहिती करु घ्यावी. जेणे करुन खरीप हंगामतील पिकांचा विमा बँका उतरवू शकतील. दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँक खाते क्रमांकाशी आधार कार्ड लिंक करावे. जर नाही केले नसेल तर २४ जुलैच्या आधी संबंधित बँकेत जाऊन आधार कार्डची एक प्रत जमा करावी. जेणेकरून आपला विमा लागू करता येईल.
Share your comments