MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

पोळा साजरा करताना बैलांची घ्यावयाची काळजी

शेतकऱ्यांचा प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे त्याच्याकडील पशुधन. बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा करतात. मात्र, सन साजरा करतेवेळी अनेक चुकीच्या रूढी आणि परंपरामुळे पशुधनाला इजा होऊ शकते.

KJ Staff
KJ Staff


शेतकऱ्यांचा प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे त्याच्याकडील पशुधन.  बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा करतात. मात्र, सन साजरा करतेवेळी अनेक चुकीच्या रूढी आणि परंपरामुळे पशुधनाला इजा होऊ शकते. अलीकडे शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर वाढत असला तरी छोट्या-मोठ्या कामासाठी पशुधनाचा वापराचे महत्त्व आजही कमी झालेले नाही.  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात त्याच्या सचोटी इतका तितकाच त्याच्या बैलांच्या कष्टाचा मोलाचा वाटा असतो.  बैलांच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा करतात. काही भागात श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्याला, तर काही भागात भाद्रपद महिन्यात पोळा साजरा करतात.  आज राज्यातील अनेक भागात पोळा साजरा केला जात आहे.

पोळ्याच्या दिवशी बैलांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांना रंगवले जाते.  त्यांची शिंगे रंगवली जातात.  त्यांच्या शरीरावर रंग-बिरंगी झुले घालून सजवले जाते.  विधिवत पूजा केली जाते.  पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.  परंतु सण साजरा करण्याच्या काही परंपरा, रूढी किंवा उत्सवामध्ये काही चुका केल्या जातात.  त्यामुळे बैलांच्या आरोग्यास इजा पोहोचू शकते.

परंपरा व त्यामुळे होऊ शकणारे इजा

 बैलांना घातले जाणारे आंघोळ यावर्षी महाराष्ट्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. परिणामी नद्या, नाले, ओढे यात मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यावर बैलांच्या आंघोळी प्राधान्याने यांनी केल्या जातात. मात्र या साठलेल्या पाण्यामध्ये जिवाणू, विषाणू, परोपजीवी व त्यांच्या अंडी असू शकतात. बैलांच्या जखमद्वारे किंवा पाणी पिण्यामुळे बैलांना संसर्ग होऊ शकतो. पाण्यामध्ये संपूर्ण गावातील जनावरे धुण्यासाठी येतात. यातून आणणे जनावरांच्या शरीरावरील परोपजीवी निरोगी बैलांवर ही प्रादुर्भाव करू शकता.

उपाय

बैलांच्या आंघोळीसाठी जलसाठेतील गडूळ दूषित पाण्याचा वापर प्रकर्षाने टाळावे. स्वच्छ पाणी वापरावे.

शरीरावरील जखमांवर उपचारासाठी प्रतिजैविकांची योग्य मात्रा पशुवैद्यकाकडून वेळीच टोचुन घ्यावी.

बैल सार्वजनिक जलस्त्रोतांच्या संपर्कात आले असल्यास बाह्य परोपजीवी नाशक औषधांचे शरीरावर फवारणी करावी.

जनावरांना जंतनाशक पाजावे.

 

शिंग साळने व शिंग रंगविणे

बैल जास्तीत जास्त आकर्षक दिसावे म्हणून शेतकरी शिंगांना आकार देतात. त्यासाठी ती साळण्याची पद्धत आहे. शिंग साळण्यासाठी वापरले जाणारे साधन धारदार व निर्जंतुक नसल्यास जखम वा इजा होण्याचा संभव असतो.  त्यातून शिंगांच्या कर्करोगाचा धोका उद्भवतो. शिंगांच्या कर्करोगावर शिंग समूळ कापणे हा एकमात्र उपाय पशुवैद्यकाकडे राहतो. अशा शिंग नसलेल्या बैलाची बाजारातील किंमत कमी होते. साळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू गंजलेली असल्यास धनुर्वात होण्याची शक्यता असते. शिंग रंगवण्यासाठी ऑइल पेंटचा वापर करतात.  अशा रंगांमध्ये झिंक ऑक्साईड, टायटॅनियम डाय-ऑक्साइड, कॅडमियम सारखे त्वचेला घातक रसायने असू शकतात.

    उपाय

  • शिंगे साळने शक्यतो टाळावे.
  • साळतांना जखम झाली असल्यास उपचार करून धनुर्वात रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
  • शिंग रंगवण्यासाठी नैसर्गिक रंग वापरावेत.

तेल आणि अंड्याचे मिश्रण पाजणे

 बैल तजेलदार, मांसल व धष्टपुष्ट दिसावेत यासाठी तेलातून अंडी पाजले जातात. हे मिश्रण चुकीच्या पद्धतीने पाजले जाते. त्यामुळे बैल ठसकतात आणि मिश्रण अन्ननलिका ऐवजी श्‍वासनलिकेत इथून फुफ्फुसात जाते, त्यामुळे फुप्फुसाचा दाह म्हणजेच निमोनिया होऊन जनावर दगावू शकते.

       उपाय

  • मिश्रण पाजताना योग्य काळजी घ्यावी, जनावर ठसकणार नाही याकडे लक्ष द्यावे.
  • तेल, अंडी यात स्निग्ध पदार्थ व प्रथिने असतात. ती स्नायूंना बळकट करण्यासाठी व वजन वाढवण्यास उपयुक्त ठरतात. मात्र त्यांना पर्याय म्हणून तेलवर्गीय यांच्या पेंडीचा वापर करावा. त्यामुळे हेतूही साध्य होईल आणि धोकाही कमी होईल.

    पीठाचे गोळे व पोळ्या चारणे

 पोळ्याच्या दिवशी व त्याआधी बैलांना ज्वारीच्या पिठाचे गोळे व नैवेद्य म्हणून पुरणपोळ्या, कडधान्याचा भरडा चारला जातो. प्रमाणाबाहेर चालल्या जाणाऱ्या या पदार्थांमुळे पोटात चोथा व सर्वात मोठ्या भागाची व्याधी निर्माण होते. रक्तातील लॅक्‍टिक ऍसिडचे प्रमाण वाढून जीवाला धोका निर्माण होतो.

       उपाय

  • पोटाच्या व्याधीमुळे बाधित जनावर पोटाला लाथा मारते, दात खाते, जीभ चावते आणि चारही पायवर करून उजव्या बाजूस लोळते, अशी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावे.
  • प्राथमिक उपचार म्हणून पाणी व खाण्याच्या सोड्याचे मिश्रण पाजावे पाजतांना जनावर ठसकणार नाही याची काळजी घ्यावी.

        संदर्भ- स्मार्ट डेअरी- डिजिटल मॅक्झिन

 

English Summary: Take care of the bulls while celebrating the pola Published on: 18 August 2020, 02:16 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters