भारतामध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या एकंदर जीवनशैलीत बराच बदल झालेला आहे आणि दिवसेंदिवस होत आहे. हॉटेल्स, मोठा ऑफिसेस, घरात म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी सध्या टिश्यू पेपरचा वापर वाढलेला दिसतो. त्यामुळे टिशू पेपरच्या मागणीत प्रचंड वाढ होताना दिसते. कोरोना काळाचा जर विचार केला तर टिशू पेपरचे महत्व आणखीनच वाढले आहे.
त्यामुळे सध्याच्या काळामध्ये टिशू पेपरच्या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. मी आजच्या लेखात टिशू पेपर निर्मिती या उद्योगाविषयी माहिती घेऊ.
भांडवलाची आवश्यकता
टिशू पेपर निर्मितीच्या व्यवसायासाठी तुमच्याकडे ३ ते साडेतीन लाख रुपयांचे भांडवल असणे आवश्यक आहे. या व्यवसायासाठी तुम्ही शासनाच्या विविध योजना किंवा पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत तुमच्या नजीकच्या बँकेशी कर्जासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला या योजनेअंतर्गत अगदी कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते.
या व्यवसायासाठी लागणारी जागा आणि उत्पादन
कुठल्याही व्यवसायाचे म्हटले तर तो व्यवसाय उभारण्यासाठी लागणारी जागा जर तुमची स्वतःची असली तर उत्तम असते. तसेच या व्यवसायाच्या उभारणीसाठी स्वतःची जागा किंवा इमारत असणे हे उत्तम असते. परंतु स्वतःची जागा नसली तर तुम्ही जागा भाड्याने घेऊ शकता. टिशू पेपरच्या उत्पादनाबाबत सांगायचे झाले तर तुम्ही दरवर्षी दीड लाख किलो टिशु पेपर्सची निर्मिती करू शकतात. जर तुम्ही तयार टिशू पेपर ६० ते ६५ रुपये दराने विकला तर तुम्ही एका वर्षाकाठी एक कोटीची उलाढाल करू शकता.
हेही वाचा : कमी गुंतवणुकीत करता येणारे व्यवसाय; यातून होईल भरघोस कमाई
या व्यवसायासाठी येणारा खर्च
टिशू पेपर निर्मितीसाठी जे यंत्र लागतात त्या यंत्रांसाठी तुम्हाला साडेचार लाख रुपये लागतात. लागणार्या कच्च्या मालाला प्रत्येक महिन्याला साधारणतः ७ लाख रुपये लागतात. शाई तसेच इतर कॅझुमेबल गोष्टींसाठी १० हजार रुपये, टिशू पेपर पॅकिंग करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याला ३ हजार रुपये, तुम्हाला दिवसाला लागणाऱ्या खर्चासाठी महिन्याला साडेसात लाख रुपये,
तसेच कामगारांचे पगार, कारखान्याला लागणारी वीज, वाहतूक व्यवस्था, टेलिफोन वरील खर्च, स्टेशनरी आणि इतर देखभालीसाठी जवळपास ५० ते ६० हजार रुपये लागतात. या व्यवसायासाठी लागणारा एकूण खर्च पहिला तर १२ लाख रुपये लागतात.
Share your comments