1. बातम्या

LPG: LPG गॅस सिलिंडरवर कॅशबॅक मिळवण्याची सुवर्ण संधी, असा लाभ घ्या

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याला स्वस्तात काहीही मिळावे आणि त्यामुळे तुमच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे. होय, जर तुम्हाला एलपीजी सिलिंडर बुक करायचा असेल आणि काही रुपये स्वस्त खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ICICI बँकेचे पॉकेट अॅप वापरून पाहू शकता. LPG रिफिल बुकिंगवर 10% कॅशबॅक (10% Cashback on LPG Refill Booking)

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याला स्वस्तात काहीही मिळावे आणि त्यामुळे तुमच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे. होय, जर तुम्हाला एलपीजी सिलिंडर बुक करायचा असेल आणि काही रुपये स्वस्त खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ICICI बँकेचे पॉकेट अॅप वापरून पाहू शकता. LPG रिफिल बुकिंगवर 10% कॅशबॅक (10% Cashback on LPG Refill Booking)

तुमच्याकडे भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेन कोणताही सिलिंडर असल्यास हे ICICI अॅप तुमच्या मोबाइल फोनवर चालते. PhonePe, Google Pay किंवा Paytm सारखे अँप देखील वापरले जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला रिफिल बुकिंगवर 10 टक्के कॅशबॅक ऑफर मिळत आहे. म्हणजेच, सिलेंडरची किंमत बुक केल्यानंतर त्यातील 10% रक्कम तुमच्या खात्यात परत केली जाईल.

हेही वाचा : Mudra Loan : घरबसल्या 2 मिनीटांत मिळवा 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज; असा करा अर्ज

50 रुपये सूट (50 Rupees Discount)

त्यानुसार तुम्हाला 50 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये ICICI पॉकेट्स अॅप डाउनलोड करावे लागेल. अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही खाली दिलेल्या सूचनांचे पालन करून कॅशबॅकचा लाभ घेऊ शकता.

एलपीजी कॅशबॅक ऑफरसाठी अर्ज कसा करावा (How to apply for LPG cashback offer)

  • कॅशबॅक मिळविण्यासाठी, तुमच्या मोबाइल फोनवर ICICI पॉकेट अॅप उघडा.
  • 'रिचार्ज आणि पे बिल' विभागात जा आणि 'पे बिल' वर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला 'Choose Biller' लिहिलेले दिसेल ज्यामध्ये तुम्हाला 'More' लिहिलेल्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • येथे तुम्हाला LPG चा पर्याय दिसेल, ज्यावर क्लिक करावे.
  • त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला LGP च्या सेवा प्रदात्याचे नाव दिसेल.
  • ज्या कंपनीकडून तुम्ही इंडेन, भारत गॅस किंवा एचपी असा गॅस घ्याल, त्याचे नाव दिसेल.
  • तुम्ही ग्राहक आहात त्या कंपनीचे नाव निवडा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका.
  • येथे तुम्हाला सिलेंडरची बुकिंग रक्कम दिसेल.
  • यावरून सिलिंडरची किंमत किती आहे, हे कळेल.
  • त्यानंतर तुम्हाला सिलिंडरच्या बुकिंगची रक्कम येथे भरावी लागेल.
  • बुकिंग केल्यानंतर 10% कॅशबॅक रिवॉर्ड मिळवा जे तुमच्या खात्यात जमा होईल.

 

येथे देखील फायदा होईल(Will Benefit Here Too)

पॉकेट अॅपद्वारे गॅस बुक करण्याव्यतिरिक्त, 200 रुपये किंवा त्याहून अधिक बिल भरल्यास कॅशबॅक देखील दिला जाईल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कोणताही प्रोमोकोड वापरण्याची गरज नाही.

English Summary: Take advantage of the golden opportunity to get cashback on gas cylinders Published on: 20 January 2022, 09:59 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters