1. बातम्या

LPG सिलेंडरवर मिळतोय कॅशबॅक, असा घ्या फायदा

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


गृहणीचा घरातील बजेट हा गॅस सिलिंडरवर अधिक जात असतो. सिलेंडरचा दर वाढला तर गृहिणींचा खर्च वाढत असतो. दरम्यान आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट ऑफर विषयी माहिती देणार आहोत, ज्यामुळे आपल्याला खिशातून पैसे जाण्याऐवजी परत माघारी येणार आहेत.  गॅस सिलेंडरच्या किंमतीमधून आपल्याला थेट ५० रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. यासाठी आपल्याला ऑनलाईन पेमेंट करावे लागणार आहे. यासाठी अमेझॉन कंपनीने ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य द्यावे यासाठी ही ऑफर आणली आहे. पण ही ऑफर फक्त ३१ ऑगस्ट पर्यत लागू असणार आहे. दरम्यान अमेझॉनने पहिल्यांदाच सिलेंडरसाठी ही ऑफर आणली आहे. 

यासाठी आपल्याला अमेझॉन पे (Amazon App) वरुन गॅस सिलेंडरसाठी पैसे भरावे लागणार आहेत. दरम्यान अमेझॉनकडून  इंडियन गॅस,एचपी गॅस, आणि भारत गॅस कंपनींकडून ऑफर दिली जात आहे. याविषयीची माहिती झी या वृत्तसंस्थेने दिली आहे. आपल्याला पण कॅशबॅक हवा असले तर सर्वात आधी आपल्याला अमेझॉन एपच्या पेमेंट ऑप्शनमध्ये जाऊन आपला गॅस सर्व्हिस वितरक निवडा आणि आपला नोंदणी झालेला मोबाईल नंबर एलपीजी नंबर टाकावा. 

मोबाईल नंबर किंवा एलजीपी नंबर टाकल्यानंतर एक एक्टिंव बुकिंगसाठी पेमेंट करण्याचे ऑप्शन समोर येईल. त्यात थेट पेमेंट करु शकतात.  किंवा नवा क्रिएट पर्याय तयार करु शकतात.  दरम्यान पेमेंट अमेझॉनवरुच ककरावे लागणार आहे. एकदा एक्टिव बुकिंगसाठी पेमेंट झाल्यानंतर आपल्याला गॅस वितरक कंपनीकडून बुकिंग आयडी मिळेल. आयडी मिळाला म्हणजे पेमेंट यशस्वीरीत्या पुर्ण झाले असेल. अमेझॉनवरुन पेमेंट कंफर्म झाल्यानंतर गॅस वितरण कंपनी आपल्या घरी सिलेंडर डिलिव्हरी करेल.  पेमेंट झाल्यानंतर कंपनीकडून आपल्याला ५० रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळणार आहे.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters