देशातील शेतजमीन सिंचनाच्या कक्षेत आणण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात या योजनेला 2015-16 साली सुरुवात झाली आहे.
कुणाला मिळेल लाभ ?
अचूक सिंचन आणि तुषार व ठिबक सिंचन अशा पाणी वाचवणाऱ्या सिंचन पद्धतींच्या वापरात वाढ करणे हा या योजनेचा हेतू आहे. तसेच प्रति थेंब अधिक पीक हे या योजनेचे ब्रीदवाक्य आहे.या योजनेचा लाभ 5 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळतो. यात अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अंशदान द्यावे, असा निकष आहे. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे.
हेही वाचा :राज्यात ९५ लाख शिधापत्रिकाधारकांनी घेतला जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ
कसा मिळेल लाभ ?
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने एक पोर्टल तयार केलेले आहे. वेगवेगळ्या राज्यात या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत वेगळी आहे. महाराष्ट्रात आपले सरकार महाडीबीटी पोर्टलद्वारे या योजनेसाठी अर्ज करता येतो.
कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, ओळखपत्र, शेतकऱ्याच्या जमिनीचं कागदपत्र. बँक पासबूक, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
दरम्यान, सन 2019-20 या वर्षात राज्यातील 1 लाख 64 हजार 692 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. याद्वारे 1 लाख 23 हजार 300 हेक्टर क्षेत्र नव्यानं सूक्ष्म सिंचनाखाली आणलं गेले आहे. यात 67 हजार 531 तुषार सिंचन संच तर 97 हजार 161 ठिबक सिंचन संचासाठी अनुदान वितरीत करण्यात आलं आहे.
Share your comments