1. बातम्या

Ravikant Tupkar : स्वाभिमानीचा रविकांत तुपकरांना अल्टीमेटम; १५ ऑगस्टपर्यंत भूमिका मांडली नाहीतर...

"रविकांत तुपकर यांना १५ ऑगस्ट पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यांनी आपल म्हणणं समितीसमोर नोंदवावं म्हणजे समितीला निर्णय घेता येईल. १५ तारखेपर्यंत तुपकर आले नाहीत. तर समिती पुढचा निर्णय घेईल."

Ravikant Tupkar Update

Ravikant Tupkar Update

पुणे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांना १५ तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. तसंच १५ ऑगस्टपर्यंत रविकांत तुपकर यांनी आपली बाजू मांडावी, अशा सूचना देखील संघटनेच्या कोअर कमिटीने दिल्या आहेत. त्यामुळे रविकांत तुपकर नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज (दि.८) रोजी पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. यावेळी शेट्टींनी वेगळ्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले की, "रविकांत तुपकर यांना १५ ऑगस्ट पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यांनी आपल म्हणणं समितीसमोर नोंदवावं म्हणजे समितीला निर्णय घेता येईल. १५ तारखेपर्यंत तुपकर आले नाहीत. तर समिती पुढचा निर्णय घेईल."

मागील काही दिवसांपूर्वी बुलढाण्यात तुपकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नाराजी बोलून दाखवली होती. याचबरोबर त्यांनी पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीची आज पुण्यात बैठक पार पडली.

English Summary: Swabhimani's ultimatum to Ravikant Tupkar Submit your position by August 15 Published on: 08 August 2023, 06:17 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters