1. बातम्या

Raju Shetti : स्वाभिमानीची ऊस परिषद परभणीत पार; राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात

तोट्याच्या शेतीमुळे तरूण शेतीतून बाहेर पडू लागले आहेत. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन आणि कापूस दरात सातत्यानं चढ़-उतार होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.

Raju Shetti News

Raju Shetti News

आनंद ढोणे

Parbhani News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस कापूस व सोयाबीन परिषद परभणीतील ताडकळस येथे पार पडली. केंद्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेती तोट्यात गेल्याने शेती करणे शेतकऱ्यांपुढे मोठे आवाहन निर्माण झाले असून याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागणार आहेत, असा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर केला आहे.

तोट्याच्या शेतीमुळे तरूण शेतीतून बाहेर पडू लागले आहेत. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन आणि कापूस दरात सातत्यानं चढ़-उतार होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे मंदीचा फटका शेतक-यांना बसू लागला आहे. उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाल्याने शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे, असंही शेट्टी म्हणाले.

पुढे शेट्टी म्हणाले की, केंद्र शासनाचे आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या ऊस सोयाबीन व कापूस या पिकांचे भाव पडण्यास कारणीभूत असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने अदानी, अंबानी सारख्या उद्योगपतींच्या हितासाठी पामतेल आणि कापसाच्या गाठी आयात करून ऐन पिकाच्या हंगामामध्ये सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडले. जिएम सीड्सच्या लागवडीसाठी परवानगी देण्याची मागणी ही यावेळी केली.

ऊस परिषदेत आणखी काय ठरले.
१) यावर्षी ऊसाला प्रतिटन एकरकमी ३३०० रुपये पहिली उचल कारखान्यांनी जाहीर केल्याशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही.
२) मागील हंगामातील ऊसाला तीनशे रुपये एफ.आर.पी.सोडून ज्यादा देण्यात यावे.
३) सोयाबीनला ९ हजार रुपये व कापसाला १२ हजार ३०० रुपये दर स्थिर ठेवण्यात यावा अन्यथा लोकप्रतिनिधींना मतदारसंघात फिरू देणार नाही.
४) चालू वर्षातील सोयाबीन वर पडलेल्या येलो मोझँक या आजाराचा पिक विम्याच्या नुकसान भरपाई ग्रस्त आजारामध्ये समावेश करून नैसर्गिक आपत्ती घोषित करावी.
५) २५ टक्के अग्रीम पिक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
६) मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती करण्यात यावी.

English Summary: Swabhimani sugarcane council passed in Parbhani Raju Shetti attack on the government Published on: 11 October 2023, 02:58 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters