त्या नुकसानीची शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या,चालु वर्षांसह थकित कर्ज माफ करा.चालु वर्षाचा पिक विमा मंजूर करा. इत्यादी मागण्या घेऊन स्वाभिमानीच्या पुजाताई मोरे, प्रशांत डिक्कर,गजानन पाटील बंगाळे यांनी शेतकरी व शेतमजूर यांची दिवाळी अंधारात जात असल्याची जाणीव करुन देण्यासाठी कार्यकर्त्यांनसह मालेगाव येथील मा.कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्या घरामधे जाऊन दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी राज्यभरात आक्रमक झाली असल्याने केंद्र, राज्यसरकार व प्रशासन चांगलेच हादरले आहे.
४ नोव्हेंबर रोजी दिवाळी दिवशी १२ वाजता ठरल्या प्रमाणे दादासाहेब भुसे यांच्या मालेगाव येथील त्यांच्या घरी स्वाभिमानीचे पदाधिकारी सह शेतकऱ्यांनी धडक दिली असता. ना.भुसे यांनी चर्चा करण्यासाठी होकार दिल्याने यांच्यात शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात तीन तास चर्चा झाली. यावर्षी अतीवृष्टी,गारपीट, ढगफुटी, चक्रीवादळ व सतत पावसाने झालेल्या नुकसानी संदर्भात बुलडाणा जिल्ह्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे. अडिच लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले असुन केवळ १ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्र नूकसान झाल्याचे दाखवुन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
हि बाब भुसे साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत नव्याने प्रशासनाकडुन बाधित क्षेत्राचा अहवाल मागवुन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेत ज्या शेतकऱ्यांना कर्ज माफि झाली नाही अशा शेतकऱ्यांची नावे मागवुन लवकरच त्यांना कर्ज माफिचा लाभ देणार असल्याचे आश्वासन यावेळी ना.भुसे यांनी दिले. पिक विमा कंपनीला निर्देश देउनही शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम देण्यास कंपन्या टाळा टाळ करत आहेत. करीता कंपनी विरोधात मी स्वतः शेतकरी पुत्र म्हणून दादासाहेब भुसे तुमच्या सोबत आहे असे या वेळी बोलतांना सांगितले.
या वेळी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा पुजाताई मोरे, स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डीक्कर,मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटिल बंगाळे, रोशन देशमुख, विट्ठल महाले,रोशन मानकर. सह पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
Share your comments