परभणी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पूर्णा तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दिगांबर देसाई आणि परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते १ ऑगस्ट २०२३ पासून चुडावा येथून पायी प्रवास करत मंत्रालयाकडे निघाले आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी दिलेले निवेदन घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना सादर करणार आहेत.
दिगांबर देसाई सध्या गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. सोबत ते शेती समस्यावर जनजागृती करीत आहेत. शेती विषया बरोबरच इतर देखील सामाजिक हिताच्या मागण्यांचे निवेदन ते मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.
प्रामुख्याने हरित क्रांती व्हावी शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा, शेतकऱ्यांना शेतीची वीज मोफत मिळावी, मराठवाडा क्षेत्रात १ हेक्टर शेतीवर ५ लाख रुपये कर्ज मिळावे, खता बियाण्यावरील जिएसटी बंद करावी,खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये अनुदान द्यावे, दुग्धव्यवसाय, कुक्कूटपालन, शेळीपालन, गोठा यासाठी तात्काळ अनुदान द्यावे, नद्याजोड प्रकल्प राबवून आवश्यक त्या ठिकाणी सिंचन तलाव उभारावेत, फार्महाऊस बांधण्यासाठी ५ लाख रुपये अनुदान द्यावे. अशा बेचाळीस मागण्यांचे हे निवेदन आहे.
दरम्यान, देसाई यांच्या ह्या मंत्रालयापर्यंत्र जवळपास ६०० किमी पायी प्रवासाच्या ठाम अशा तळमळीच्या निर्णयामुळे त्यांचे कृषीजगतातून कुतूहल व्यक्त होत आहे. त्याचबरोबर लांब पल्ल्याचा पायी प्रवास करताना त्यांच्या तब्येतीची काळजी कशी असणार? पावसाळ्याचे दिवस असल्याने हा प्रवास यशस्वी करण्यासाठी त्यांना खूप त्रास होणार आहे. यामुळे ज्ञानेश्वर देसाई यांच्या निर्णयाचे कौतुक देखील केलं जात आहे.
Share your comments