1. बातम्या

बळीराजाच्या उत्पन्नापेक्षा कर्जाला जास्त गती. का होतोय बळीराजा कर्जबाजारी?

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
farmer debt

farmer debt

भारत हा कृषिप्रधान देश म्हणुन ओळखला जातो पण जर अशा कृषिप्रधान देशात कृषिची उपासना करणारा शेतकरीच जर कर्जबाजारी झाला तर मग अशा कृषिप्रधान देशाचा काय उपयोग? असा खोचक सवाल आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात उत्पन्न होत आहे. सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी काही ना काही उपाययोजना करत असते जेणेकरून त्यांचे कर्जाचे ओझे कमी होईल, पण ह्या सर्व्या उपाययोजना करूनही शेतकऱ्यांचे संकट काही कमी होत नाही आणि अशातच एक आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे.

 ह्या आकडेवारीनुसार स्पष्ट होते की शेतकऱ्यांचे उत्पन्न तर काही दुपटीने वाढले नाही पण कर्ज मात्र दुपटीने जास्त वाढले आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 8 वर्षांच्या (2013-2019) दरम्यान, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 30 टक्के वाढ झाली आहे, तर त्यांच्या कर्जामध्ये सुमारे 58 टक्के वाढ झाली आहे.

इंडिया टुडेच्या एका रिपोर्ट नुसार, 2003 मध्ये शेतकऱ्यांचे वार्षिक सरासरी उत्पन्न 25,380 रुपये होते, तर त्यांचे कर्ज 12,585 रुपये होते.  2013 मध्ये उत्पन्न 77,112 रुपये होते आणि कर्ज 47,000 रुपये होते. परंतु 2019 मध्ये जेव्हा उत्पन्न 1,00,044 पर्यंत वाढले तेव्हा कर्जाचा बोजा वाढून 74,121 रुपये झाला.  आकडेवारी दर्शवते की 2003 पासून सरासरी उत्पन्नात 4 पट वाढ झाली आहे, परंतु त्याच कालावधीत कर्जामध्ये 6 पट वाढ झाली आहे.

 

शेतकरी होतोय कर्जबाजारी पण ह्याचा सखारात्मक परिणाम पण असू शकतो

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार असं स्पष्ट होते की बळीराजा हा अजूनही कर्जबाजारीच आहे पण जरी आपल्याला हे वरवर असं वाटत असले तरी अनेक विशेषज्ञ असे सांगतात की ही एक सकारात्मक बाब पण असू शकते कारण की, अलिकडच्या वर्षांत कर्ज वाटपाचे प्रमाण हे खुप वाढले आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांना जास्तीत जास्त कर्ज मिळावे आणि ते सहजपणे शेतीची कामे करू शकतील हाही सरकारचा मानस आहे म्हणुन

अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज मिळावे म्हणुन सरकार देखील प्रयत्नरत आहे आणि हे एक चांगले लक्षण असू शकते कारण हे दर्शवते की शेतीमध्ये गुंतवणूक वाढत आहे आणि येत्या काळात ती अजूनच वाढेल,आणि गुंतवणूक वाढली की साहजिकच शेतकरी चांगले उत्पादन घेतील आणि परिणामस्वरूप शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल.

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters