पुणे शहरातील कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली असून सोमवारी (ता. ९) शहरात ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. सरासरीपेक्षा तापमानात दोन अंशांनी वाढ झाली होती. कमाल तापमानात होत असलेली वाढ यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत असून दिवसा घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
कोरड्या हवामानामुळे सध्या उन्हाचा ताप अधिकच जाणवू लागला आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा झालेली काहीशी वाढ यामुळे ऑक्टोबर हीटचा प्रभाव होत आहे. पुणे शहरात उन्हाच्या चटक्यांची अनुभूती होत असून पुढील आठवडाभर ही स्थिती अशीच कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा अनुभव येणार असून राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर हिटचे चटके बसण्यास सुरुवात होणार आहे. तापमान वाढल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
उकाडा आणि उन्हाचा ताप नागरिकांना असाच सहन करावा लागणार आहे. तर येत्या रविवारपर्यंत (ता.१५) शहर आणि परिसरात कमाल तापमान हे ३५ ते ३७ अंशांपर्यंत पोहचू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
बटाट्याच्या या जाती शेतकऱ्यांना बनवत आहेत श्रीमंत, जाणून घ्या...
राज्यात ही सध्या असेच चित्र पाहायला मिळत असून उन्हाचा चटका वाढल्याने विदर्भ देखील भाजून निघत आहे. दरम्यान, सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे ३७.१ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात पारा ३४ अंशांच्या पुढे आहे.
'गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी महामंडळाची प्रतिटन दहा रुपये होणारी कपात रद्द करा'
Share your comments