
orange farmers
महाराष्ट्रातील विदर्भात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. विदर्भातील संत्रांना लोकांची मोठी पसंती मिळते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरही विदर्भातील संत्र्यांना प्रचंड मागणी असते. नागपुर आणि अमरावती हे जिल्हे संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत, पण तेथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण बांग्लादेशने भारतीय संत्र्यावर ६० टक्के आयातशुल्क लावले आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. छोट्या आकाराच्या संत्रीला खरीददार न मिळाल्याने शेतकऱ्यांवर ही संत्री फेकुन देण्याची वेळ आली आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा आणि भारत सरकारने बांग्लादेशसोबत व्यापारविषयक बोलणी करून, हे शुल्क मागे घेतले जाऊ शकते किंवा त्यामध्ये काही सवलत मिळू शकते. यातुन मार्ग काढुन संत्रा उत्पादकांचे होणारे मोठे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते असे ट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी वाणिज्यमंत्री पियुषजी गोयल यांच्याकडे विनंती केली आहे.
सुप्रिया सुळे ट्वीटरवर म्हणाल्या की, महाराष्ट्रातील विदर्भात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. येथील संत्री दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी असणारे आहेत. बांग्लादेशात विदर्भातून संत्री पाठविली जातात. परंतु अलिकडच्या काळात तेथे संत्र्यावर ६० टक्के आयातशुल्क लादण्यात आले आहे. त्यामुळे तेथील संत्र्यांची निर्यात बाधित झाली असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांन बसत आहे. केंद्र सरकारने सार्क देशांच्या करारानुसार आपसात आयात शुल्क सवलती देणाऱ्या अटी मान्य केल्या आहेत. त्याचा आधार घेऊन भारत सरकारने बांग्लादेशसोबत व्यापारविषयक बोलणी केल्यास हे शुल्क मागे घेतले जाऊ शकते किंवा त्यामध्ये काही सवलत मिळू शकते. माझी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुषजी गोयल यांना विनंती आहे की, हा विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक संत्रा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान यामुळे टळू शकते तरी कृपया त्यांनी या मागणीची दखल घेऊन यावर सकारात्मक कार्यवाही करावी, असंही सुप्रिया सुळे ट्वीटरवर म्हणाल्या.
Share your comments