Nivritti Indorikar Maharaj : निवृत्ती इंदोरीकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून दणका; गुन्हा दाखल होणार
पुत्र प्राप्ती बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. त्यामुळे खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदोरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयांमध्ये धाव घेतली होती.
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज यांच्या विरोधातील मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे इंदोरीकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पुत्र प्राप्ती बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. त्यामुळे खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदोरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयांमध्ये धाव घेतली होती. पण खंडपीठाचे निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने इंदुरीकर यांना दणका दिला आहे. त्यामुळे इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नेमकं प्रकरण काय होतं?
इंदुरीकर महाराज यांनी शिर्डी येथील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केलं होतं. सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असं इंदुरीकर म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला होता.
English Summary: Supreme Court slams Nivritti Indorikar A case will be filedPublished on: 08 August 2023, 04:33 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments