सध्या टोमॅटो उत्पादनात घट झाल्यामुळे दर चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे टोमॅटो दरांची चर्चा सामान्य माणसांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत होऊ लागली आहे. टोमॅटोच्या दराबाबत अभिनेता सुनील शेट्टी यांनी मागील काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. तर त्या वक्तव्यानंतर शेट्टी सोशल मिडीयावर ट्रोल झाले. तसंच शेतकऱ्यांनी देखील टीका केल्यानंतर सुनील शेट्टी यांनी नाराजी व्यक्त करत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.
सुनील शेट्टी नेमके काय म्हणाले?
‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले होते, “माझी पत्नी फक्त ताज्या आणि दोन दिवस टिकणाऱ्या भाज्या आणते. आम्ही ताज्या भाज्या घेणं पसंत करतो. मात्र अलीकडे टोमॅटोचे दर खूप वाढले आहेत. त्याचा परिणाम आमच्याही स्वयंपाकघरावर झाला आहे. त्यामुळे आजकाल आम्ही टोमॅटो कमी खात आहोत. यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
तसंच मी एका ॲपवरून भाज्या मागवतो. त्या ॲपवर भाज्यांच्या किंमती पाहिल्यावर तुम्ही थक्क व्हाल. इतर मार्केट आणि ॲप्सच्या तुलनेत तिथे भाज्या स्वस्त आहेत. पण इथे फक्त पैशांचा प्रश्न नाही, तर भाज्यांच्या ताजेपणाचाही आहे. आम्हाला प्रॉडक्ट, त्याचं मूळ आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या प्रकाराचीही माहिती मिळते. हे सर्व पाहून मी समाधानी आहे. माझ्या या खरेदीच्या संपूर्ण प्रक्रियेचा फायदा शेतकऱ्यांना होतो. कारण त्यांची उत्पादनं थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतात. ”
सुनील शेट्टी यांनी मागितली माफी
सुनील शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ते सोशल मिडीयावर प्रचंड टोल झाले. तसंच शेतकऱ्यांकडून देखील टीका करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मागितली आहे. ते म्हणाले की, “मी खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांचं समर्थन करतो. त्यांच्याबद्दल नकारात्मक धारणा बाळगण्याचा मी विचारही करू शकत नाही. तसंच शेतकरी हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.
माझ्या कोणत्याही वक्तव्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो. त्यांच्या विरोधात बोलण्याचा विचार मी माझ्या स्वप्नातही विचार करू शकत नाही. कृपया माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका."
उर्फीने चक्क टोमॅटोचे कानातले घातले
चित्रविचित्र कपड्यामुळे कायम चर्चेत असणारे नाव म्हणजे उर्फी जावेद. जावेद काल टोमॅटोचे कानातले घाऊन काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना उर्फीने खास कॅप्शनदेखील लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,"टोमॅटो आता नवीन सोनं आहे". उर्फीचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Share your comments