सुर्यफुल हे महत्वाचे तेलवर्गीय पिक आहे. खरीप ,रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक असून हे पिक कमी कालावधीत येते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच सुधारित वाणांचा वापर करून शेतकरी सुर्यफुलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेवू शकतात.
जमीन -
सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. हे पिक आम्लयुक्त व पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या-आडव्या दोन ते तीन पाळ्या घ्याव्यात.
पेरणीची वेळ -
रब्बी हंगामात ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी. पेरणी शक्यतो टोकण पद्धतीने करावी. उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये पेरणी करावी.
संकरित वाण -
एनएच-१, बीएसएस-११, एपीएसएस-११. सुधारित वाण : शारदा, आनेगीरी, नारी-६, परभणी कुसुम, परभणी-80, एसएस.५६ मॉडर्न, सुर्या, सनराइज सिलेक्शन, भानु, पिकेव्हीएसएच-२७, पिकेव्हीएसएच-९५२, केबीएसएच-१, केबीएसएच-४४, डिआरएसएच-१, एमएसएफएच-८, एमएसएफएच-१७, फुले रविराज, एलएसएफएच-१७१,
आंतरपीक -
आंतर पीक पद्धतीमध्ये भुईमूग + सूर्यफूल पेरणी करावी.
पेरणीचे अंतर मध्यम ते खोल जमीनीसाठी ४५ x ३0 सें.मी.अंतर ठेवावे
भारी जमिनीसाठी ६0 × ३0 सें.मी.अंतर ठेवावे
संकरित वाणसाठी 60 × ३0 सें.मी. पेरणीचे अंतर ठेवावे.
रासायनिक खते -
पेरणीपूर्वी प्रती हेक्टर २.५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतामध्ये चांगले मिसळावे, बागायती पिकास हेक्टरी ६० किलो नत्र, ३0 किलो स्फुरद व ३0 किलो पालाश द्यावे. त्याचबरोबर पेरणीच्या वेळी गांडूळ खत, शेणखत अथवा कंपोस्ट खतातून द्यावे.
Share your comments