खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील जवळपास सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील अंबड तालुक्यात चार वेळा अतिवृष्टी झाली त्यामुळे खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिके मातीमोल झालीत. अंबड तालुक्यात सुकापुरी मंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात खरीपमध्ये कापसाचे पीक घेतले जाते गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात देखील मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती, मात्र अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकावर विपरीत परिणाम झाला परिणामी उत्पादनात घट झाली केवळ दोन वेचणीमध्ये कापसाचे पीक शेतकऱ्यांना उपटावे लागले. म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी कापसाचे पीक उपटून उन्हाळी सोयाबीन लागवडीचे सत्र हातात घेतले.
सुकापुरी परिसरात शेतकऱ्यांनी एक नाविन्यपूर्ण प्रयोग करत खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची लागवड रब्बी हंगामातील उन्हाळी पीक म्हणून जोमात सुरू केली. परिसरातील शेतकऱ्यांनी जवळपास चारशे हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन पेरणी केली आता या परिसरातील उन्हाळी सोयाबीन जोमात बहरला आहे. शेतकऱ्यांना या नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी तालुक्याचे कृषी अधिकारी सचिन जी गिरी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले सचिन जी गिरी यांच्या सल्ल्यानेच परिसरातील रुई येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड केली रूईच्या रामा मुळे यांना देखील कृषी अधिकाऱ्याचे मोलाचे सहकार्य लाभले कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार रामा मुळे यांनी फुले संगम या वाणाचे 30 किलो बियाणे ऊन्हाळी हंगामासाठी उपयोगात आणले. रामा यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. सध्या रामा यांचे उन्हाळी सोयाबीन फूल जोमात असून फळधारणा झाली आहे. रामा यांनी आत्तापर्यंत उन्हाळी सोयाबीन ला दोन वेळा रासायनिक खतांच्या मात्रा तसेच दोन वेळा औषध फवारणी केली आहे, त्यांना त्यांच्या उन्हाळी सोयाबीनच्या पिकातून दर्जेदार उत्पन्नाची आशा आहे. खरीप हंगामात घेतले जाणारे सोयाबीन हे आता रब्बी हंगामात देखील यशस्वीरीत्या घेतले जाऊ शकते याचेच उदाहरण येथील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी उभे केले आहे.
उन्हाळी सोयाबीन आगामी काही दिवसात काढण्यासाठी सज्ज होणार आहे. परिसरातील सोयाबीन पीक काही ठिकाणी फुलोऱ्यात बघायला मिळते तर काही ठिकाणी शेंगांना लगडलेले पहावयास मिळते. यामुळे परिसरात केला गेलेला उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे आगामी काही दिवसात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीन बाजारपेठेत बघायला मिळेल. उन्हाळी सोयाबीन बियाण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते त्यामुळेदेखील परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेतले जात आहे.
उन्हाळी सोयाबीन दाणेदार आणि दर्जेदार येत असल्याने बियाण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो त्यामुळे पुढील हंगामात बियाण्यासाठी कमतरता भासणार नाही एवढे नक्की.
Share your comments