1. बातम्या

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २१.५ टक्क्यांनी वाढली उन्हाळी लागवड

देशात वाढली उन्हाळी लागवड

देशात वाढली उन्हाळी लागवड

देशभरात यंदा उन्हाळ्यात होणारी लागवड (Summer Planting) वाढली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २१.५ टक्क्यांनी लागवडीत वाढ झाली आहे. मागील वर्षी ६०.६७ लाख हेक्टरवर (Hector) उन्हाळी हंगामात (summer season)लागवड झाली होती., यंदा ७३.७६ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे,अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे. कृषी मंत्रालयाने (Ministry of Agriculture) दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजीच्या आकडेवारीनुसार, देशात मागील वर्षाच्या तुलनेत २१.५ टक्क्यांनी उन्हाळी लागवड वाढली आहे.

मागील वर्षात उन्हाळी लागवड ६०.६७ हेक्टरवर झाली होती, तर यंदा याच काळात ७३.७६ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. कृषी मंत्रालयाने जानेवारी २०२१ मध्ये एक राष्ट्रीय चर्चा सत्र आयोजित करुन उन्हाळी हंगामातील आव्हाने, लागवडीची शक्यता आणि उपाययोजना राज्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी , बियाणे आणि खतांच्या उपब्धतेसह लागवडी खालील क्षेत्राच्या विस्तारासाठी दिशानिर्देश दिले होते.
तांत्रिक सहकार्यासाठी राज्य कृषी विद्यापीठ (एसएसयु) आणि कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) यांच्यात समन्वय साधला गेला. याचा एकत्रित परिणाम उन्हाळी लागवडीवर झाल्याचे केंद्रीय कृषी विभागाने म्हटले आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होणार लागवड

देशाच्या विविध राज्यांच्या विचार करता उन्हाळी हंगामातील लागवड मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालते. ही उन्हाळी पिके शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक उत्प्न मिळवून देतात, त्यासह ग्रामीण रोजगारही उपलब्ध होतो. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे उन्हाळी हंगामात डाळवर्गीय पिकांची लागवड वाढत असल्याने जमिनीचे आरोग्यही सुधारते. देशभरात झालेल्या चांगल्या पावसामुळे उन्हाळी पिकांसाठी पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे लागवड वाढल्याचे निरीक्षणही कृषी विभागाने नोंदविले आहे.

 

तेलबियांच्या लागवडीला प्राधान्य

तेलबियांच्या लागवडीत चांगली वाढ झाली आहे. मागील वर्षी ९.०३ लाख हेक्टवर तेलबियांची लागवड झाली होती. यंदा १०.४५ लाख हेक्टरवर झाली आहे. पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात तेलबियांची लागवड वाढली आहे. तेलबियांच्या लागवडीबाबत शास्त्रशुद्ध आणि अत्याधुनिक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्यामुळे ही लागवड वाढल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा : एकरकमी एफआरपी देण्याची अट रद्द होणार; ऊसदराचा प्रश्न पुन्हा पेटणार

या कारणांमुळे झाली वाढ

मागील पावसाळ्यात देशभरात चांगला पाऊस झाल्यामुळे उन्हाळ्यातही पिकांसाठी पाण्याची चांगली उपलब्धता आहे. परिणामी शेतकऱ्यांचा उन्हाळ्यात पिके घेण्याकडे कल आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी विभागांनी कृषी विभागांनी राखलेला योग्य समन्वय केलेले नियोजन आणि शेतकऱ्यांचे कष्ट याचा एकत्रित परिणाम म्हणून उन्हाळी लागवड वाढल्याचे केंद्रीय कृषी विभागाने म्हटले आहे. देशभरात मागील वर्षाच्या तुलनेत साधारणपणे १२.७५ लाख हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ झाली आहे. ही वाढ तमिळनाडू, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, छ्त्तीसगड, महाराष्ट्र, आणि कर्नाटक आदी राज्यात विशेषकरून झाली आहे. यापैकी काही राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शंभर टक्क्यांनी लागवडी खालील क्षेत्र वाढले आहे.

 

भात लागवड सोळा टक्क्यांनी वाढली

उन्हाळी भात लागवडीत सुमारे , १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षी ३३.८२ लाख हेक्टर लागवड करणाऱ्या राज्यात झाली आहे. त्यात पश्चिम बंगाल, तेलगंणा, कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, तमिळनाडू आणि बिहारमध्ये झाली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters