1. बातम्या

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

अनेक भागात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. कोकणात दिवसाबरोबरच रात्रीच्या किमान तापमानाचा पारही सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह, कोकणातील तापमानही अधिक राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका जाणवणार असला तरी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे.

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत २०१६ पासून उन्हाळा आणि हिवाळा हंगामात उपविभागनिहाय तापमानाचा अंदाज जाहीर केला जातो. मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिम प्रारुपच्या आधारे हवामान विभागाने मार्च ते मे २०२१ या तीन महिन्यांतील तापामानाचा अंदाज सोमवारी जाहीर केला आहे. या अंदाजानुसार उन्हाळ्यात उत्तर, वायव्य आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये उन्हाचा झळा वाढणार आहेत. तसेच पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा, छत्तीसगडसह पश्चिम किनाऱ्यावरील कोकण, गोव्यात कमाल तापमान सरारीच्या वरच राहण्याची शक्यता अधिक आहे.

 

कोकण- गोवा विभागात रात्रीच्या किमान तापमानाचा पारा अधिक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उत्तर, वायव्य, ईशान्य भारतातील सर्वच विभागासह, पूर्व किनाऱ्यावरील ओडिसा , छत्तीसगड, आंध्रप्रदेशचा किनारपट्टीय भाग, पश्चिम किनाऱ्यावरील गुजरात, सौराष्ट्र, कोकण-गोवा या विभागांत कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे.

 

दक्षिण भारतासह लगतच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भ या मध्य भारतातील विभागात दिवसा कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीतच रात्रीच्या किमान तापमानाचा विचार करत, हिमालय पर्वताच्या पायथ्यासह उत्तर भारत, वायव्य भारत, मध्य भारताचा पश्चिम भाग, दक्षिण भारताच्या किनापट्टीय भागात किमान तापमान सरासरीच्या वर राहणार आहे.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters