डॉ. आदिनाथ ताकटे, ऐश्वर्या राठोड
शेतकरी बंधुनो, उन्हाळी हंगाम जवळ सुरु झाला आहे. त्या दृष्टीने या उन्हाळी हंगामात कोण कोणती पिके घ्यावीत? त्यासाठी जमिन कशी असावी/ निवडावी.! पेरणी कशी, केव्हा करावी? पेरणीकरिता बियाणे कोणते वापरावे? बीजप्रक्रिया कशी करावी? खत व्यवस्थापन कसे करावे? एकंदरीतच या उन्हाळी हंगामातील पिकांचे नियोजन कसे करावे. नियोजन करताना काय काळजी घ्यावी. या विषयी हा खास लेख.
उन्हाळी हंगामात पिकांचे उत्पादन कमी येण्याची महत्वाची कारणे कोणती
बदलते हवामान
योग्य वेळी पेरणी न करणे
योग्य अंतरावर पेरणी न कारणे
पाण्याचे व्यवस्थापन(पाण्याची कमतरता)
वाणांची उपलब्धता
सेंद्रिय व जैविक खतांचा अभाव
रासायनिक खतांची असंतुलित मात्रा
कीड व रोग व्यवस्थापन
उन्हाळी हंगामातील प्रमुख पिके : उन्हाळी हंगामात प्रामुख्याने बाजरी, मुग, भुईमूग, सुर्यफुल, तीळ, या पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करतात.
उन्हाळी मुग
कमी पाण्यात ,कमी दिवसात आणि कमी खर्चात येणार हे कडधान्याच पीक
त्याकरिता मध्यम ते भारी,उत्तम निचऱ्याची जमिन निवडावी
क्षारयुक्त,पाणथळ तसेच उतारावरील हलक्या जमिनीत लागवड करू नये
जमिनीची हलकीशी नांगरट करून कुळवाची पाली द्यावी व सर्वसाधरणपणे ६ ते ८ टन शेणखत अथवा कंपोस्ट खत द्यावे
पेरणी व बियाणे
सर्वसाधारणपणे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्च चा पहिला पंधरवडा या दरम्यान पेरणी करावी
पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी.,पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० से.मी. व दोन रोपातील अंतर १० से.मी. ठेवावे.
हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे.
वाण व बीजप्रक्रिया
उन्हाळी मुगाच्या पेरणीसाठी
पुसा वैशाखी,वैभव,पी.कें.व्ही ग्रीन गोल्ड कोपरगाव, एस-८, फुले एम-२ या वाणांची निवड करावी
सर्वसाधरणपणे हे वाण ६५ ते ७० दिवसात तयार होतात
पेरणी पूर्वी प्रथम कार्बेन्डॅझिम ३ ग्रॅम/किलो अथवा Trichoderma ५ ग्रॅम/किलोची बीजप्रक्रिया करावी.त्यानंतर जीवाणू खतांची रायझोबियम व स्फुरद विरघळवणांरे जीवाणू (PSB) यांची २५ ग्रॅम /किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकवावे आणि नंतर पेरणी करावी
खत खत व्यवस्थापन
पेरणीपूर्वी पूर्ण कुजलेले शेणखत ६ ते ८ टन प्रति हेक्टरी कुळवणीच्या वेळी द्यावे.
पेरणी करते वेळी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद अथवा १०० किलो DAP प्रति हेक्टरी द्यावे.
पीक फुलोऱ्यात असताना २ % युरिया (२० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून) ची फवारणी करावी.
शेंगा भरताना २ % DAP ((२० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून)ची फवारणी करावी
उन्हाळी भुईमूग
मध्यम प्रकारची.भुसभुशीत,पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी.
सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण योग्य असणारी
भारी जमिनीत लागवड करू नये.
हलक्या जमिनीत पाण्याचे व्यवस्थापन करावे.
जमिन तयार करताना नांगरणीची खोली १२ ते १५ से.मी एवढीच असावी.
जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात
पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना अथवा वखराने काढताना आर्या तुटून शेंगा जमिनीत राहतात,परिणामी उत्पादनात घट येते.
पेरणी व बियाणे
उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी
पेरणी करताना उपटया जातीसाठी दोन ओळीतील अंतर ३० से.मी. व दोन रोपातील अंतर १० से.मी. ठेवावे. निम पास्र्या वाणांसाठी ४५ X१० से.मी ठेवावे.
कमी आकारच्या दाणे असलेल्या वाणासाठी १०० किलो/हे
मध्यम आकारच्या दाणे असलेल्या वाणासाठी १२५ किलो/हे
टपोरे दाणे असलेल्या वाणासाठी १५० किलो/हे या प्रमाणे बियाणे वापरावे
वाण व बीजप्रक्रिया
SB 11,TAG-24, TG-26, JL-501,Phule 6021=100 kg/ha
फुले प्रगती, फुले व्यास, TPG-41,फुले उनप,फुले भारती =125 kg/ha
पेरणी करण्यापूर्वी थायरम ५ ग्रॅम अथवा कार्बेन्डॅझिम २ ग्रेम अथवा मॅन्कोझेब३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
त्यानंतर जीवाणू खतांची रायझोबियम व स्फुरद विरघळवणांरे जीवाणू (PSB) यांची २५ ग्रॅम /किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकवावे आणि नंतर पेरणी करावी.
द्रवरूप जीवाणू ((Rhizophos) 100 ml/ 100 kg seed
खत व्यवस्थापन
पेरणीपूर्वी पूर्ण कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत १० टन प्रति हेक्टरी कुळवणीच्या वेळी द्यावे.
पेरणी करते वेळी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद + ४०० किलो जिप्सम प्रति हेक्टरी द्यावे.
या पैकी २०० किलो जिप्सम पेरणी करतेवेळी व उर्वरीत २०० किलो आर्या सुटताना द्यावे
मध्यम काळ्या जमिनीत उन्हाळी भुईमुगाच्या अधिक उत्पादन,पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर तसेच अधिक फायद्यासाठी ५ टन शेणखत प्रति हेक्टरी पूर्व माश्गातीच्या वेळी व शेवटच्या कुळवाच्या अगोदर द्यवे.शिफारस खत मात्रेच्या १००% खते (२५:५० नत्र:स्फुरद किलो/हेक्टरी) विद्राव्य स्वरुपात ठिबक सिंचनातून ९ समान हप्त्यात द्यावे..
उन्हाळी भुईमुगाचे नियोजन करत असताना महत्वाचे मुद्दे
पीक फुलोराच्या अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा ताण देणे अंत्यत महत्वाचे
आरया सुटण्याचं अगोदर आंतरमशागत करू नये
आरया सुटण्याच्या अगोदर युरियाची मात्रा देऊ नये
महत्वाच्या पीक अवस्था
फुले येण्यची अवस्था ( पेरणीपासून २२-३० दिवस)
आरया सुटण्याची अवस्था (पेरणीपासून (४०-४५ दिवस)
शेंगा पोसण्याची अवस्थ (पेरणीपासून ६५ ते ७० दिवस)
या अवस्थेमध्ये पाण्याची पाणी चुकवू नये
उन्हाळी बाजरी
आह्रारच्या दृष्टीने बाजरी हे एक अंत्यत महत्वाचे तृणधान्य पीक,अत्यंत पौष्टिक घटक, उर्जा देणारे एकमेव धान्य....
उन्हाळी बाजरीसाठी मध्यम ते भारी ,पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी
जमिनीची १५ से.मी.खोल नांगरणी करावी, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमिन भुसभुशीत करावी
शेवटच्या कुळवणी पूर्वी हेक्टरी १० ते १५ हदया शेखात किंव कंपोस्ट खत पसरावे नंतर कुळवणी करावी
पेरणी
बाजरीची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी.
पेरणीस उशीर झाल्यास परागीभवनावर पुढील काळातील अति उष्ण हवामानाचा अनिष्ट परिणाम होतो आणि दाणे कमी प्रमाणात भरून उत्पादन घटते.
दोन चाडाच्या पाभारीच्या साहय्याने ३० x १५ से. मी.अंतरावर पेरणी करावी
पेरणी २ ते ३ से. मी पेक्षा जास्त खोलीवर पेरणी करू नये
पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे पुरेसे होते
वाण
संकरीत वाण- आदिशक्ती ,फुले महाशक्ती ,JHB558
सुधारित वाण –धनशक्ती ,ICMV-221
खाजगी कंपनीचे ८६ एम ६४, ८६ एम ८६ NBH4767,प्रताप कावेरी सुपर बॉस
बीजप्रक्रिया
अरगट रोगाच्या नियंत्रणासाठी २०% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करावी.,त्यसाठी १० लीते पाण्यांत २ किलो मीठ विरघळावे.
गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यास मेटॅलॅक्झील (३५ एस डी) ६ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
त्यानंतर जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी
अझोस्पिरीलम/अॅझोटोबॅकटर २५ ग्रॅम + स्फुरद विरघळवणांरे जीवाणू (PSB) यांची २५ ग्रॅम /किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकवावे आणि नंतर पेरणी करावी
खत व्यवस्थापन
हेक्टरी शेणखत अथवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवाची पाळी देताना द्यावे.
पेरणी करताना ४५ किलो नत्र ४५ किलो स्फुरद व ४५ किलो पालाश द्यावे. उर्वरीत ४५ किलो नत्र २५ ते ३० दिवसांनी खुरपणी केल्यानंतर द्यावे.
उन्हाळी सूर्यफुल
उन्हाळी सूर्यफुलाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी ,पाण्याचा चागला निचरा होणारी जमिन निवडावी आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत लागवड करू नये
पेरणी
उन्हाळी सूर्यफुलाची पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
मध्यम खोल जमिनीत 45 x 30 से.मी व भारी जमिनीत 60X 30 से.मी
तसेच संकरीत आणि जास्त कालावधीच्या वाणांची 60X 30 से.मी. अंतरावर पेरणी करावी
पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी,म्हणजे बी व खत एकाच वेळी पेरता येते.
बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये
बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकन पद्धतीने करावी.
पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८ ते १० किलो /हेक्टरी तर
संकरीत वाणाकरिता ५ ते ६ किलो /हेक्टरी बियाणे वापरावे
वाण व बीजप्रक्रिया
उन्हाळी सूर्यफुलाच्या पेरणीसाठी
सुधारित वाणामध्ये फुले भास्कर,भानू, एस एस ५६,
तर संकरीत वाणा मध्ये KBSH 44,फुले रविराज ,MSFH 17 या वाणांची निवड करावी
मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २ ते २.५ ग्रम थायरम किंवा ब्रासिकॉल प्रति किलो बियाण्यास चोळावे.
केवडा रोग टाळण्यासाठी ६ ग्रम अॅप्रोन ३५ एस डी. प्रति किलो बियाण्यास चोळावे
तसेच विषाणूजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रीड ७० डब्लू ए गाऊचा ५ ग्रम प्रति किलो बियाण्यास चोळावे
त्यानंतर अॅझोटोबॅकटर २५ ग्रॅम /किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
खत व्यवस्थापन
उन्हाळी सूर्यफुलास पेरणीच्या वेळी ३० किलो नत्र ,६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश द्यावे,उर्वरीत नत्राची मात्रा खुरपणी झाल्यानंतर २५ -३० दिवसांनी द्यावी.
गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी शेणखतामध्ये मिसळून द्यावे
उन्हाळी तीळ
जमिन : मध्यम भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी ,वालुकामय ,पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओल असल्यास पीक चांगले येते.
पेरणी :१५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावी .
पेरणी ३० x १५ अथवा ४५ x १० से.मी. अंतरावर करावी.
२.५ से.मी पेक्षा जास्त खोल अंतरावर बी पडणार नाही याची काळजी घ्यावी.
तीळ बी बारीक असल्याने ,बी वाळू ,राख, माती किंवा शेणखत मिसळून पेरणी करावी
हेक्टरी २.५ ते ३ किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.
वाण : जे एल टी ४०८-२ ( फुले पूर्णा), ए के टी -१०१ ( ९०- ९५ दिवस)
बीज प्रक्रिया :
थायरम ३ ग्रम अथवा कार्बाडेन्झीम अथवा Trichoderma ४ ग्रॅम/किलो
अॅझोटोबॅकटर व पी एस बी. प्रत्येकी २५ ग्रॅम /किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
खत व्यवस्थापन
५ टन शेणखत , एरंडी पेंड १ टन
५० किलो प्रति हेक्टर ( २५ किलो पेरणीच्या वेळी ,उर्वरीत २५ किलो २१ दिवसांनी)
अधिक उत्पादनासाठी पीक फुलोरयात असताना बोंडे वाढीच्या अवस्थेत २% युरिया ची फवारणी करावी
फुले येण्याचा काळ आणि बोंडे येण्याचा काळात पाणी देणे आवश्यक
लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे,मृदशास्त्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ ,राहुरी, मो.९४०४०३२३८६
ऐश्वर्या राठोड, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषि विद्या विभाग, म,फु.कृ.वि.,राहुरी
Share your comments