शेतकऱ्यांसाठी फायदेशीर उत्पादने देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सल्फर मिल्सने बीपीएच आणि व्हाइटफ्लायवर लक्ष केंद्रित करणारी तीन नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. कोरोना सारख्या संकटात आपण बाहेर पडू शकत नसल्याने कंपनीने या प्रोड्क्ट्सचे इ-लॉन्चिंग केले आहे. कृषी जागरण मराठीच्या पेजवरून त्यांनी आपले नवीन दोन प्रोड्क्टस लॉन्च केले आहेत.
''सल्फर मिल्स उच्च तंत्रज्ञानाची ओळख करुन देण्यात अग्रेसर आहे. आम्ही टेकनो-झेड आणि झिंडाच्या नावाने झिंकची प्रगत फॉरम्युलेशन अशी अनेक प्रगत सूत्रे सादर केली. उत्पादनांचा वापर केल्यानंतर शेतातील उत्पादनातील झिंक सामग्री उच्च झाली. आजकाल लोक मानवातील प्रतिकारशक्ती वाढीसाठी जस्त पोषक आहार घेण्याविषयी बोलत आहेत, ”असे सल्फर मिल्स लिमिटेडचे सीईओ वीरभद्रम म्हणाले. दरम्यान सल्फर मिल्सने आधी आपली काही उत्पादने लॉन्च केली आहेत. आता दोन नवीन उत्पादने सादर केली आहेत. बुलटॉन आणि स्कॉर्पिओ या दोन उत्पादनांची लॉन्चिग शनिवारी कृषी जागरणच्या फेसबुक पेज आणि झुम या अॅपवरून करण्यात आले. यावेळी कंपनीचे संचालक सुकेतू डोशी , वितरक मुख्य अधिकारी जॉय डेब, सीईओ वीरभद्रम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बुल्टॉन, हे फुंगसवर काम करणारे स्पे असून यात थिओफेनेट मेथिईल डिस्पर्सिबल ग्रॅन्यूल (डब्ल्यूजी) फॉर्म्युलेशन तंत्रज्ञान आहे. यातील लहान कण आकार (2-4 मायक्रॉन), पाण्यात एकसारखे पसरते, बुल्टॉन हे उत्पादन खर्च-प्रभावी, संरक्षणात्मक, उपचारात्मक आणि निर्मूलन बहुउद्देशीय बुरशीनाशक म्हणून काम करते.
काय आहेत वैशिष्ट्ये
- बुल्टॉन हे पिकांवर मारल्यानंतर पाण्याने धुतल्या जात नाही.
- पाण्यात चांगल्या पद्धतीने विरघळते .
- डस्ट फ्री म्हणजे यात कोणत्याही प्रकारची घाण नसते.
- मोजण्यासाठी खूप सोपे आहे.
- साठवणूक करणे सोपे.
विशेष म्हणजे बुल्टॉन खूप किफायतशीर किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. बुल्टॉन हे बोर्डेक्स मिश्रणासारख्या जोरदार क्षारीय पदार्थांशिवाय बर्याच फंगीसाइड्सशी सुसंगत आहे. बुलटॉनचा वापर प्रति एकर 300 ग्रॅम ते 400 च्या प्रमाणात 1.5 ते 2 ग्रॅम / लि.
सल्पर मिल्सने बुल्टॉनसह स्कॉर्पिओ नावाचे उत्पादन ही लॉन्च केले आहे. हे एक किटकनाशक असून सोयाबीन, कपाशी, बीटी कॉटन, मिरची वरील किडींवर आळा घालते.
Share your comments