1. बातम्या

साखरेचा गोडवा सातासमुद्रापार, महाराष्ट्रातील ‘या’ शहरात जागतिक संग्रहालय

पुणे- महाराष्ट्राच्या विकासात साखरेचं विशेष योगदान आहे. राज्याच्या अर्थकारणाला दिशा देण्याची महत्वाची भूमिका राज्यातील साखर उद्योगाने बजावली आहे. साखरेच्या गौरवशाली इतिहासाला जागतिक पटावर आणण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय (sugar museum) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ललिता बर्गे
ललिता बर्गे
suger museum

suger museum

पुणे- महाराष्ट्राच्या विकासात साखरेचं विशेष योगदान आहे. राज्याच्या अर्थकारणाला दिशा देण्याची महत्वाची भूमिका राज्यातील साखर उद्योगाने बजावली आहे. साखरेच्या गौरवशाली इतिहासाला जागतिक पटावर आणण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय (sugar museum) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यात (pune) संग्रहालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता संग्रहालय उभारण्याचा निर्णय विचाराधीन होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्र्यांची समिती:

संग्रहालयाच्या उभारणीसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. पुणे येथील साखर संकुलातील विस्तीर्ण जागेवल प्रस्तावित संकुल उभारले जाईल. साखर संग्रहालयास प्रशासकीय मान्यता देणे, संग्रहालयाचे डिझाईन अंतिम करणे, निधी उपलब्ध करुन देणे, संग्रहालयाच्या बांधकाम विषयक कामकाजाचा आढावा घेणे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक समिती तसेच सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली साखर संग्रहालयाच्या प्रत्यक्ष उभारणी कामकाजावर देखरेखीसाठी कार्यकारी समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.

साखर संग्रहालय उभारणीसाठी अंदाजे 40 कोटी पर्यत खर्च अपेक्षित असून त्यासाठी शासनाने साखर आयुक्तांना तीन वर्षात सदर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. साखर संग्रहालयाच्या उभारणीबाबतचे आरेखन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतून निवड करण्यात येईल.

..तर, जगातील तिसरे संग्रहालय:

जागतिक स्तरावर मॉरिशस आणि जर्मनी नंतर तिसरे साखरेचे संग्रहालय महाराष्ट्रात असणार आहे. याच धर्तीवर शहरात साखरेचा इतिहास सांगणारे संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मांडला होता.

असे असेल संग्रहालय:

साखर संकुल येथील पाच एकर जागेत संग्रहालय उभारणी प्रस्तावित आहे. अंदाजित वर्षाला किमान दहा लाख लोक भेट देतील असे सादरीकरण करण्यात आले आहे.

ऊस ते साखर निर्मिती प्रक्रिया मांडणारे युनिट,सभागृह, छायाचित्रांचे प्रदर्शन असे जागतिक दर्जाचे संग्रहालयाचे स्वरुप असणार आहे.

साखरेचं महाराष्ट्राशी नातं:

ऊस व साखरेचं महाराष्ट्राचं पूर्वापार पासून कनेक्शन आहे. साखरेभोवती अर्थकारणासोबत राजकारणाचे चक्रही गतिमान होतात. साखरेचा गौरवशाली इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून जगासमोर आल्यास पर्यटक व अभ्यासकांना आकर्षित करता येऊ शकते. 

English Summary: suger museum establish in pune Published on: 24 September 2021, 10:30 IST

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters