यावर्षी अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांशी फडांमध्ये अजूनही ऊस उभा असून अक्षरशः उसाला तुरे फुटले आहेत. एवढेच नाही तर उसाच्या वजनामध्ये देखील घट येण्याची दाट शक्यता आहे. कारखान्यांचा गाळप हंगाम हा आता अंतिम टप्प्यात आहे.
परंतु अतिरिक्त उसा
चा प्रश्न संपायचे नाव घेत नाही. यामध्ये थेटमराठवाड्यातील काही जिल्ह्यातील तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी थेट पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची मदत घेतली जाणार आहे.त्या संदर्भातला प्रस्ताव थेट साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिला जाणार आहे. जर साखर आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली तर मराठवाड्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न सुटायला मदत होणार आहे. असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
सध्याच्या मराठवाड्यातील उसाचा प्रश्न
तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये या वर्षी उसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने बहुतांशी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परंतु मराठवाड्यात जास्त प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढल्याने तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचा विचार केला तर एकूण अकरा साखर कारखाने या जिल्ह्यांमध्ये सुरू असून या कारखान्यांच्या माध्यमातून उसाचे गाळप करण्यात आले परंतु तरीसुद्धा ऊस फडात शिल्लक आहे.
हे नक्की वाचा:पशुपालकांनो! म्हैस परत परत उलटते तर ही आहेत त्या मागची कारणे आणि लक्षणे
येथील साखर कारखान्यांनी त्यांची असलेल्या क्षमतेपेक्षा देखील जास्त गाळप केले तरी सुद्धा अतिरिक्त उसाचा प्रश्न आहे. यामध्ये जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तरया परिसरातील जवळजवळ ऊस गाळप पूर्ण झाल्यात जमा आहे. जे काही थोडेफार उसाचे क्षेत्र शिल्लक आहेत याची देखील तोडणी वेळेत होईल पण पश्चिम महाराष्ट्रातील यंत्रणा जर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कामे नाही आली तर शेतकऱ्यांचे खूपच नुकसान होणार आहे.
त्यामुळे मराठवाड्यातील अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची वाढीव मदत घेण्यात येणार आहे. यासाठी साखर आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्यात येणार असून यासंबंधीची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
Share your comments