मुंबई : ऊसतोड कामगारांच्या मुलांचा शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. याबाबत जिल्हा पातळीवर होणाऱ्या कार्यवाही संदर्भात तातडीने बैठक घेऊन आढावा घेण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या समस्यांबाबत लवकरच आढावा घेणार असल्याचे सांगितले.
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या साखरशाळा आणि आरोग्य याविषयी बुधवारी विधान परिषदेत पुरवण्या मागण्यांवर चर्चेदरम्यान सदस्य सुरेश धस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. साखर कारखाना मालक साखर शाळांबाबत गंभीर नाहीत. त्यामुळे आपल्या पालकांबरोबर स्थलांतर करणारे विद्यार्थी शाळाबाह्य होतात. परिणामी भविष्यात ही मुले ऊसतोडीकडे वळतात. यामुळे या समस्या सोडविण्यासंदर्भात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सूचना केल्या.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, नुकतीच भारतात जी 20 परिषद झाली यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शाश्वत विकास साध्य करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर आदी विषयावर भर देण्यात आला. जागतिकीकरण युगात शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही विषयांवर प्राधान्याने काम करणे गरजेचे आहे. शाश्वत विकासाच्या अनुषंगाने झालेल्या कामांची माहिती आणि यशोगाथा उदा. नैसर्गिक आपत्ती, जागतिक तापमान, महिला सक्षमीकरण, लैंगिक समानता, आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषीउद्योग व व्यापारात वापर याची देवाणघेवाण व्हावी. विविध देशांसोबत विविध क्षेत्रात झालेल्या करारांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यात यावेत.
प्रत्येक देशामध्ये कामगार, महिला हक्काकरिता सहकार्य व सामूहिक जबाबदारी बाबत उपाययोजना करण्यात याव्यात. भारतात लैंगिक समानतेत महिलांच्या शिक्षणात विशेषतः उच्च शिक्षणात पुरुषांपेक्षा जास्त प्रमाण आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतामध्ये वेल्स देशाचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून भारत आणि वेल्स दोन्ही देश मिळून सांस्कृतिक, सामाजिक, पर्यटन, रोजगार आणि अन्य क्षेत्रातही विकासात्मक कार्य केले जाईल, असा विश्वास वेल्स देशाच्या शिष्टमंडळाने यावेळी व्यक्त केला.
Share your comments