1. बातम्या

उसाला 75 रुपये मिळणार? अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पुणे, राज्यात सध्या अतिरिक्त उसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. असे असताना आता मे महिना संपत आला तरी अनेकांचे ऊस शिल्लक आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली जात आहे. राज्यात आज अखेर १७ लाख टन अतिरिक्त ऊस शिल्लक (Excess Sugarcane) असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

Large losses to farmers due to excess sugarcane

Large losses to farmers due to excess sugarcane

पुणे, राज्यात सध्या अतिरिक्त उसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. असे असताना आता मे महिना संपत आला तरी अनेकांचे ऊस शिल्लक आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली जात आहे. राज्यात आज अखेर १७ लाख टन अतिरिक्त ऊस शिल्लक (Excess Sugarcane) असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. आता या उसाचे काय असा प्रश्न अजूनही अनेकांना पडला आहे.

आता या शिल्लक उसाचे नेमके काय गौडबंगाल आहे, हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. याबाबत शिल्लक उसाला हेक्टरी ७५ हजार रुपये अनुदान (Sugarcane Subsidy) अतिरिक्त वाहतुकीसाठी सरकारने ५ रुपये प्रतिटन प्रतिकिलोमिटरचे अनुदान तसेच ज्या शेतकऱ्याचा ऊस जळीत करून गाळप केला. त्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केली.

अनेकांनी आपला ऊस जात नसल्याने ऊस जाळला होता. यामुळे याचा फटका त्यांना बसला आहे. याबाबत भाजप किसान मोर्चाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर ५ मे रोजी बेमुदत धरणे आंदोलन केले होते. यावेळी शेतकऱ्यांना काही आश्वासने देण्यात आली होती.

शेतकऱ्यांना वीज बिल माफी!! अर्थसंकल्पात योगी सरकारची मोठी घोषणा..

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व साखर आयुक्तांनी राज्यात २८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाविना शिल्लक असल्याचे आंदोलनस्थळी जाहीर केले होते. मात्र हा आकडा नेमका खरा आहे की खोटा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावेळी राज्यातील एकही टन ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते.

शेतकऱ्याच्या मुळावर कोण उठलय? युरियाचे पाणी टाकल्याने चाळीतील कांदा नासला

याबाबत ५ मे ते आजअखेर सरकारच्या आकडेवारीनुसार रोज सरासरी दीड लाख टनांचे गाळप झाले असेल तर १८ दिवसांत जवळपास सर्व उसाचे गाळप झाले असते. परंतु त्यांची लबाडी या निमित्ताने उघड होताना दिसत आहे. आजही १७ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. याचा सरळ अर्थ हे सरकार राज्यातील ऊस उत्पादकांना उध्वस्त करण्याचे काम करत आहे, असेही काळे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या;
आता कोल्हापूर सांगलीत पूर येणार नाही, अलमट्टी धरणाबाबत झाली महत्वपूर्ण बैठक
एकीचे बळ! मल्चिंग पेपरचे गाव, आधी दुष्काळग्रस्त म्हणून ओळख, आता झाले बागायती
सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा! पंतप्रधान आवास योजनेची रक्कम वाढणार, आता मिळणार ४ लाख..

English Summary: Sugarcane will get Rs 75? Large losses to farmers due to excess sugarcane Published on: 27 May 2022, 03:05 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters