1. बातम्या

गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर केला नाही, कारखान्यावर कारवाई करा

सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. यामुळे ऊसदर किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना शासन निर्णयानुसार साखर कारखान्यांनी (Sugar Factory) गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर (SugarCane) जाहीर करणे बंधनकारक आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
sugar factory

sugar factory

सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. यामुळे ऊसदर किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना शासन निर्णयानुसार साखर कारखान्यांनी (Sugar Factory) गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर (SugarCane) जाहीर करणे बंधनकारक आहे.

कऱ्हाड तालुक्यातील रयत अथणी वगळता इतर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. कारखाने सुरू होऊन 15 दिवस झाले मात्र निर्णय झाला नाही, यामुळे या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

यामुळे रयत क्रांती संघटनेच्या वतीने ऊस दर जाहीर न करून शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच कारवाई झाली नाही तर न्यायालयामध्‍ये फसवणूक झाली, अशी याचिका दाखल करणार आहोत. असे निवेदनात म्हटले आहे.

इंडोनेशियामध्ये भूकंपाचा कहर, 162 ठार शेकडो जखमी..

याबाबत येत्या तीन दिवसांत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी साखर आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे आयुक्त काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.

रोजगार मेळावा प्रारंभ, 75 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरीत, मोदींची घोषणा..

दरम्यान, राज्यात उस दरावरून राजकीय वातावरण तापले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी देखील आंदोलन करत आहेत. यासाठी ते 25 तारखेला चक्का जाम आंदोलन देखील करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या;
यामध्ये 15 कोटींपेक्षा जास्त मिरचीचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे
माळेगाव कारखान्याचा निर्णय उच्च न्यायालयानेही फेटाळला, पवार समर्थकांना मोठा धक्का..
शेतकऱ्यांची परिस्थिती बघून कृषिमंत्र्यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन, महावितरणने थांबवली वसुली

English Summary: Sugarcane price not announced start fall season, take action against factory Published on: 23 November 2022, 04:21 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters