महाराष्ट्र राज्यात यंदा उसाचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. अलीकडच्या काळात राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. तसेच ऊस हे हुकमी पीक असल्याने शेतकरी वर्गाला यातून कमी कष्टात फायदा मिळत असल्यामुळे उसाची लागवड सर्वत्र वाढली आहे.तसेच तंत्रज्ञानाचा आणि विज्ञानाच्या मदतीमुळे आता उसापासून इथेनॉल निर्मिती सुद्धा केली जाणार आहे त्यामुळे इंधनाचा खर्च सुद्धा कमी होणार आहे. इथेनॉल च्या निर्मितीसाठी उसाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासणार आहे त्यामुळे ऊस लागवड वाढली पाहिजे असे सुद्धा सांगितले जात आहे.
एकरी उत्पन्न हे 100 टन निघावे:
तसेच ऊस पिकाबरोबरच इतर पिकांचे सुद्धा उत्पन्न घेतले पाहिजे असे आवाहन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री यांनी केले आहे. उसाचा भाव हा ठरलेला असल्यामुळे शेतकरी विचार न करता उसाची लागवड करत आहे आणि नफा मिळवत आहेत. तसेच एकरी उत्पन्न हे 100 टन निघावे यासाठी कृषी विभाग सुद्धा जनजागृती करत आहे.सध्या राज्यातील ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे तसेच बऱ्याच लोकांचा असा समज आहे की ऊस हे आळशी लोकांचे पीक आहे. परंतु हे सत्य नाही. उसाची लागवड केल्यापासून ते तोडणी पर्यंतचा काळ हा सरासरी 1 वर्ष म्हणजेच 12 महिन्यांचा असतो. या बारा महिन्यात उसाची योग्य रित्या देखभाल करणे खूप गरजेचे असते.
हेही वाचा:प्रधानमंत्री वनधन योजनेतील ही आहेत आव्हाने आणि संधी, वाचा सविस्तर
उसासाठी पाण्याचे आणि खताचे नियोजन खूप गरजेचे आहे महत्वाचे असते.जरी रानात 12 महिने ऊस असला तरी उसाला सुद्धा भरपूर कष्ट लागतात. खते देणे, वेळेवर पाणी देणे, वाळलेली पाचट काढणे, ऊस फोडणे, ऊस बांधणे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या इत्यादी प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे ऊस हे आळशी न्हवे तर कष्टकरी लोकांचे पीक आहे असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केले आहे.
ऊस लागवड क्षेत्रात वाढ व्हावी असे सुद्धा आवाहन शेतकरी वर्गाला दिले आहे.ऊस लागवडीसाठी फायदा म्हणजे रास्त भाव, तसेच कारखाना ऊस तोडणी करून नेतो आणि उसाचा भाव हा फिक्स आणि ठरलेला असतो म्हणून उसाला हुकमी पीक सुद्धा म्हटले जाते.
Share your comments