1. बातम्या

Sugarcane : संपूर्ण ऊसाचे गाळप करा; पालकमंत्री यांचे निर्देश

राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गाळप हंगाम संपत आला तरी लातूर जिल्ह्यात फडातच ऊस शिल्लक आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी ऊस कारखान्याला गेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Sugarcane

Sugarcane

राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गाळप हंगाम संपत आला तरी लातूर जिल्ह्यात फडातच ऊस शिल्लक आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी ऊस कारखान्याला गेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील गाळपाअभावी शिल्लक राहिलेल्या ऊसाच्या संदर्भाने पालकमंत्री अमित देशमुख यांनी बैठक घेतली. या बैठकिला जिल्हा प्रशासन, साखर आयुक्तालय व सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्याच्या व्यवस्थापक हजर होते. मे अखेरपर्यंत कारखाने चालवून जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे निर्देश दिले आहेत.

पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, सर्व साखर कारखान्यांनी जवळपासची गावे विभागून घेऊन जलद गाळपासाठीचे नियोजन करावे. सभासद व बिगस सभासद असा भेद न करता सर्वांचा ऊस गाळप करावे. सोलापूर व नांदेड जिल्ह्यातील बंद होत असलेल्या कारखान्यातील ऊस तोडणी यंत्रणा मागवून घ्यावी.

बिग ब्रेकिंग : गव्हाच्या निर्यातीवर बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

शेजारी जिल्ह्यात बंद होत असलेल्या कारखान्यातील हार्वेस्टरचे अधिगृहन करावे. लातूर जिल्हाधिकारी यांनी नांदेड व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून तोडणी यंत्रणेच्या अधिगृहनाबाबत कार्यवाही करावी.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या अफवा पसरवल्या जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी. असे निर्देश या बैठकीदरम्यान पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

ऊस तोडणी यंत्रणा उपलब्ध करुन देण्यासाठी नांदेडमध्ये राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व सोलापूर जिल्ह्यातील आमदार बबनदादा शिंदे यांना आपण स्वतः विनंती करणार असल्याचे यावेळी अमित देशमुख यांनी सांगितले.

Wether Update : मान्सूनचे केरळमध्ये दणक्यात होणार आगमन; आणि महाराष्ट्रात...

English Summary: Sugarcane: Grind whole cane; Instructions of the Guardian Minister Published on: 14 May 2022, 03:48 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters