Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गगनबावडा येथिल पद्मश्री डॉ.डी.वाय पाटील सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा जास्तीचा दर जाहीर केला आहे. यंदाच्या चालू गळीत हंगामात येणाऱ्या उसास प्रतिटन ३२०० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे.
यावेळी आमदार पाटील म्हणाले की, मागील वर्षी कारखान्याने एफआरपीपेक्षा प्रतिटन १४७ रुपये जादा दिले असून चालू वर्षीही एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. चालू हंगामाची एफआरपी ३७६२ रुपये आहे. त्यातून तोडणी खर्च वजा करुन शेतकऱ्यांना फक्त ३०२० रुपये मिळतात. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी १८० रुपये अधिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, कारखान्याने २ डिसेंबरअखेर १ लाख १५ हजार १० मे.टन उसाचे गाळप करून १ लाख ६ हजार ७५० क्विंटल साखर पोती यांचे उत्पादन घेतले आहे. चालू वर्षी कारखान्याचे ५.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून त्याकरिता ९८२६ हेक्टर उस क्षेत्राची नोंद झाली आहे.
Share your comments