राज्यात उसाचा गाळप हंगाम आता संपुष्टाच्या मार्गावर आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या हंगामात उसाचे रेकॉर्ड तोड गाळप झाले आहे. या हंगामासाठी जवळपास साडेबारा लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. असे असले तरी या हंगामात अजूनही अनेकांचा ऊस फडातच उभा आहे. त्यामुळे अनेक भागातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला होता, हीच गोष्ट लक्षात घेऊन आता साखर आयुक्तांनी परिपत्रक जारी केले आहे. आता कारखान्याकडे नोंद झालेल्या तसेच विना नोंद केलेल्या उसाचे अद्यापही गाळप राहिले असेल तर आता शिल्लक ऊसाचे देखील गाळप होणार असल्याचे समजत आहे.
हंगाम पूर्ण होण्याअगोदर जर एखाद्या क्षेत्रातील उसाचे गाळप झाले नाही तर या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार त्या क्षेत्रातील कारखाना संचालक असणार असे देखील सांगितले जात आहे. कारखान्यांपुढे असलेले उद्दिष्ट जर पूर्ण झाले तर कारखाने ऊस गाळप हंगाम संपुष्टात आणून टाकतात त्यामुळे याबाबत साखर आयुक्तानी एक परिपत्रक जारी केले आहे, आणि साखर कारखानदार यांना सूचना करण्यात आल्या आहेत. साखर आयुक्तांच्या परिपत्रकानुसार, कुठल्याच साखर कारखान्याला आयुक्तांच्या परवानगीशिवाय गाळप बंद करता येणार नाही. गाळप हंगाम बंद करण्यापूर्वी त्या संबंधित क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी तसेच कारखान्याचे सभासद गण यांनादेखील कळवणे अनिवार्य राहणार आहे. यासंदर्भात जुलै महिन्यातच राज्यातील साखर कारखान्यांना आयुक्तांकडून परिपत्रक पाठवल्याचे समजत आहे. तसेच जर साखर कारखाने आयुक्तांच्या परिपत्रकाला नजर अंदाज करून विनापरवानगी गाळप हंगाम बंद करतील, तर त्या क्षेत्रातील उत्पादक शेतकऱ्यांच्या फळात राहिलेला उस ही सर्वस्वी त्या कारखान्याची जबाबदारी राहील.
म्हणजे नोंद झालेल्या उसाची तसेच विना नोंदी गाळप राहिलेल्या उसाची देखील जबाबदारी त्या क्षेत्रातील साखर कारखान्यावर राहणार असल्याचे समजत आहे. या हंगामात रेकॉर्ड तोड ऊस गाळप झाली असली तरी अजूनही अनेक शेतकऱ्यांचे उस फडातच उभे आहेत. या हंगामात उसाचे क्षेत्र अधिक असल्याने कारखानदारांनी वरवरची मलाई खाण्या प्रमाणे चांगल्या दर्जाचा ऊस गाळप करून टाकला. मध्यंतरी राज्यात अवकाळी पावसाचे सावट होते त्याचा फटका उसाच्या पिकावर न होता उस वाहतुकीवर झाला त्यामुळे कारखान्यात ऊस घेऊन जाण्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडथळे आलेत.
जालना आंबेजोगाई बीड या जिल्ह्यातील ऊस याच कारणाने अजूनही फडात उभा दिसतो. अजूनही ऊस फडातच असल्याने आणि ऊस परिपक्व झाल्याने उसाची तोड आत्ताच होणे अनिवार्य आहे नाहीतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तिकडे वाटोळ झालं तरी चालेल पण आता आमचं ठरविलेले उद्दिष्ट साध्य झाले आहे अशी भूमिका कारखानदारांनी घेतलेली दिसते. त्यामुळे राहिलेल्या उसाच्या गाळपकडे दुर्लक्ष करीत आहेत, असंच चित्र अनेक जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
Share your comments