नुकत्याच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री माननीय शरद पवार यांनी अतिरिक्त उसावर एक विधान केले होते. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मते ऊस हे केवळ आळशी शेतकऱ्यांचे पीक आहे. तसेच पवार यांनी उसासोबतच काही अन्य हंगामी पिकांची लागवड करण्याचा शेतकऱ्यांना बहुमोल सल्ला देखील दिला होता.
मात्र ऊस (Sugarcane) आळशी शेतकऱ्याचे पीक त्यांच्या या वक्तव्यावर अनेक शेतकरी नेत्यांनी विरोध दर्शवला होता. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी ( Raju Shetty of Swabhimani Shetkari Sanghatana) आघाडीवर होते. राजू शेट्टी यांनी पवार यांचा चिमटा घेत उस हे आळशी शेतकऱ्यांचे पीक आहे मग आपल्या नातवाचे एवढे साखर कारखाने कसे असा खोचक सवाल त्यावेळी उपस्थित केला होता.
आता अतिरिक्त उसाबाबत (Extra Sugarcane) व उसाच्या वाढत्या क्षेत्राबाबत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक विधान केले आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या मते, उसाचे क्षेत्र या पद्धतीने दिवसागणिक वाढत राहिले तर एक दिवस ऊस उत्पादक शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागेल.
नितीन गडकरी यांनी पुढे बोलताना सांगितले की ऊस हे एक शाश्वत उत्पादन देणारे पीक असले तरी देखील शेतकरी बांधवांना काही अन्य पिकांची लागवड करण्याचा देखील विचार करावा लागेल. याशिवाय उसापासून इथेनॉल निर्मिती केल्याशिवाय आता शेतकऱ्यांना पर्याय उरणार नसल्याचे देखील नितीन गडकरी यांनी यावेळी नमूद केले आहे.
IMPORTANT NEWS : कांद्याने केला वांदा! कपाशी उपटून लावला कांदा अन आता म्हणतोय कांदा नको रे बाबा
या वर्षी भारतात सर्वात जास्त साखर उत्पादित केली गेली आहे. ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या साखरेला मागणी देखील अधिक आहे. मात्र ही मागणी ब्राझील मध्ये साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे आहे.
त्यामुळे विक्रमी गाळप झाले म्हणून आमदार बबनराव यांच्या चेहऱ्यावरचे हसू आहे ते देखील तात्पुरते आहे. भविष्यात जर याच पद्धतीने ऊसाचे क्षेत्र वाढत राहिले तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक धोक्याची घंटी सिद्ध होणार असून यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच आत्महत्या करावी लागू शकते. असे नितीन गडकरी यांनी या वेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगितले.
पुढे नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला देत सांगितले की ऊस पिकामागे न धावता पीक पद्धतीत बदल करीत दुसऱ्या हंगामी पिकांची लागवड करून देखील चांगले उत्पादन घेतले जाऊ शकते. या वर्षी अतिरिक्त उसाची केवळ चिंता आहे मात्र पुढील वर्षी यापेक्षा बिकट परिस्थिती असणार असल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
निश्चीतच नितीन गडकरी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ज्या पद्धतीने शरद पवार यांच्या वक्तव्यावर राजकारण तापले होते अगदीच त्या धर्तीवर नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर देखील राजकारण तापण्याची दाट शक्यता आता बघायला मिळत आहे.
IMPORTANT NEWS : मोठी बातमी! या पद्धतीने e-KYC केली नाही तर PM Kisan चा 11 वा हफ्ता बँकेत जमा होणार नाही
Share your comments