यावर्षी राज्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके बाजूला ठेवून ऊस लागवडीवर भर दिलेला आहे. सर्वकाही नीट चालले होते तो पर्यंत अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि सगळ्या नियोजनावर पाणी फिरवल. ऊस लागवड लांबच जे की रब्बी चा पेरा सुद्धा झाला नाही. अजूनही राज्यातील काही भागात वापसा निघाला नसल्याने पेरण्या तसेच ऊस लागवड रखडलेली आहे. नगदी पिकामध्ये उसाला जास्त महत्वाचे स्थान आहे. फक्त पश्चिम महाराष्ट्र मधेच न्हवे तर मराठवाड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात उसाची लागवड पाहायला मिळत आहे.
खरीप नंतर ऊसाचेच होते नियोजन:-
यावेळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिके नष्ट झाले आणि यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली जे की ती भरून काढण्यासाठी शेतकरी ऊस लागवडीवर भर देत होते. कृषी विभागाने असा अंदाज वर्तविला होता की पश्चिम महाराष्ट्रात तर उसाचे क्षेत्र वाढणार होतेच त्याचबरोबर मराठवाडा मध्ये सुद्धा यावेळी विक्रमी लागवड पाहायला भेटणार होती. मात्र अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने सर्व नियोजनावर पाणी फेरले.
असे झाले रोपवाटिकांचे नुकसान:-
हंगामाच्या सुरुवातीस पोषक वातावरण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उसाची रोपे तयार करण्यात आली मात्र अचानक मागणी कमी झाल्याने रोपे आहे तशीच पडून राहिली. सध्या पावसाने तर उघडीप दिली आहे मात्र ढगाळ वातावरण असल्याने वापसा निघत नाही त्यामुळे नर्सरी मध्ये रोपांचे प्रमाण थांबवले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी उसाच्या पट्यात पावसाने हजेरी लावल्याने उसाची लागवड करणे शक्य झाले नाही. आता पाऊस थांबला आहे मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे वापसा निघाला नाही तसेच रोपे पडून राहिल्याने रोपवाटिकाचे नुकसान झाले आहे.
रोपांचे प्रमाण वाढले अन् मागणी घटली:-
उसाच्या तयार झालेल्या रोपांची लागवड २५ दिवसात करणे गरजेचे असते परंतु सध्याच्या स्थितीला रोपे तयार करून २ महिने झाले तरी सुद्धा अजून मागणी नसल्याने रोपवाटिका मालक चिंतेमध्ये आहेत. ऑक्टोम्बर महिन्यात रोपांची मागणी जास्त असते मात्र डिसेंबर चाली असून सुद्धा रोपांना मागणी नाही. रोपवाटिका तयार करण्याची स्पर्धा तर वाढली आहे त्याचा सुद्धा फटका बसत आहे.
Share your comments