Sugar Rate :
सणांच्या दिवसांमध्येच मिठाई महाग होण्याची शक्यता आहे. साखरेच्या दरात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे आगामी काळातील सणांमधील गोडव्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मागील ६ वर्षातील सर्वात मोठी वाढ आहे. सध्या साखरेचा प्रतिटन दर ३७ हजार ७६० रुपये आहे.
साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर व्यापारी आणि उत्पादकांची चिंता वाढली आहे. तशीच ग्राहकांची देखील चिंता वाढली आहे. दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारातील दरावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
टोमॅटो, कांदा, डाळी पाठोपाठ आता साखर पुन्हा एकदा महाग झाली आहे. साखरेच्या किमतीत ३ टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी साखरेचे दर ३७,७६० रुपये प्रति टन पर्यंत वाढले. ऑक्टोबर २०१७ नंतरचे सर्वोच्च दर आहेत. विशेष म्हणजे साखरेच्या किमतीत ३ टक्क्यांनी वाढ झाल्याने गेल्या ६ वर्षांतील उच्चांक गाठला आहे.
२०२३-२४ मध्ये साखर उत्पादनात घट झाली तर आगामी काळात साखरेचे दर वाढण्याची जास्त शक्यता आहे. साखरेच्या किंमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दर वाढू शकतात. याचा परिणाम खाद्यपदार्थांवर होऊ शकतो, असे साखर उद्योगातील जाणकार सांगतात.
साखरेचे दर वाढत राहिले तर आगामी काळात केंद्र सरकार साखर निर्यातीवर बंदीही घालू शकते, असंही साखर उद्योगातील जाणकार सांगतात. निर्यातबंदी केल्यास देशांतर्गत बाजारात साखरेच्या किंमती कमी होतील.
दरम्यान, देशातील प्रमुख साखर उत्पादक असलेले कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात यंदा कमी पाऊस झाला आहे. यामुळे त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होण्याची शक्यता आहे, असे काही उत्पादक आणि व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
Share your comments