यावर्षी संपूर्ण राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आहे. आता उसाचा हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे मात्र तरीदेखील अतिरिक्त उसाचा प्रश्न काही सुटलेला नाही. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे. ऊस अधिक काळ फडात उभा राहिल्याने उसाच्या वजनात मोठी घट होत आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत असल्याचे समजत आहे.
लातूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील अशाच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. लातूर जिल्ह्यात खरिपात चांगला पाऊस झाल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली. उसाच्या क्षेत्रात वाढ झाली यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यातील काही साखर कारखाने हंगामाच्या सुरवातीपासूनच बंद राहिल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न लातूर जिल्ह्यात अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.
महत्वाची बातमी:-धक्कादायक! मोदी सरकारने पीएम किसान योजनेचा निकष बदलला महाराष्ट्रातील तब्बल 21 लाख शेतकरी राहणार वंचित
आता मात्र लातूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण की शेजारील राष्ट्र कर्नाटक मधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळू लागली आहे. कर्नाटक मधील एकूण सहा साखर कारखाने लातूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहेत. या साखर कारखान्यांनी मजूर आणून जिल्ह्यातून जवळपास एक लाख मेट्रिक टन उसाची तोड केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाल्याचे समजत आहे.
महत्वाची बातमी:-Papaya Cultivation: 'या' पद्धतीने पपई लागवड करा आणि कमी वेळेत कमवा लाखों
जिल्ह्यात या हंगामात उसाची लागवड वाढली. निलंगा समवेतच आजूबाजूच्या तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात उसाची लागवड बघायला मिळाली. एकीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली गेली तर दुसरीकडे हंगामाच्या सुरुवातीपासूनच अंबुलगा आणि किल्लारी सहकारी साखर कारखाने बंद बघायला मिळाले. यामुळे जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न सुटता सुटत नव्हता. मात्र आता कर्नाटक मधील सहा साखर कारखाने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यास सरसावले आहेत.
कर्नाटक मधील बिदर जिल्ह्याच्या भालकेश्वर शुगर लिमिटेड, महात्मा गांधी सहकारी साखर कारखाना, नारंजा सहकारी साखर कारखाना, बिदर किसान सहकारी साखर कारखाना, भंगुर शुगर खांडसरी, जय भवानी शुगर खांडसरी या सहा सहकारी आणि खासगी कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्याचा ऊस गाळपासाठी नेला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हे कारखाने दररोज तीन हजार मेट्रिक टन ऊस घेऊन जात आहेत.
महत्वाची बातमी:-लई भारी! उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून भाजीपाला पिकांची लागवड, झाला दुहेरी फायदा; पुरस्कारासाठी नामांकन
याव्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यातील कारखाने देखील लातूर जिल्ह्याच्या मदतीला पुढे सरसावले आहेत. लोकमंगल सहकारी साखर कारखाना, मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, गोंद्री येथील साईबाबा शुगर लिमिटेड, जागृती शुगर, हनुमान शुगर खांडसरी, बलसूर येथील भाऊसाहेब सहकारी साखर कारखाना हे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने लातूर जिल्ह्याच्या मदतीला धावून आल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी अजूनही निलंगा तालुक्यात 45 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा आहे.
महत्वाची बातमी:-नोकरीच टेन्शन हवेतच विरणार!! शेतकरी पुत्रांनो 'हा' व्यवसाय बनवेल तुम्हाला सधन
Share your comments