राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. आता पावसाळा सुरु झाला तरी अनेकांचे ऊस फडातच आहेत. कारखाने बंद झाले आहेत. यामुळे आता या उसाचे करायचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे आता शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. याबाबत त्यांनी एक निर्णय घेतला आहे.
ऊसाची फडातील काय अवस्था आहे. याची पाहणी करुन संपूर्ण अहवाल घेऊन राजू शेट्टी हे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेणार आहेत. ते म्हणाले, 1 लाख हेक्टरहून अधिकच्या क्षेत्रावरील ऊस शिल्लक असताना अचानक गाळप पूर्ण करुन साखर कारखानेही बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? अतिरिक्त उसाबरोबर थकीत एफआरपी यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढला जावा या मागणीच्या अनुशंगाने ही भेट महत्वाची आहे.
यावर्षी राज्यात हंगाम तब्बल 7 महिने सुरु राहिला. राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आणि अधिकचे उत्पादन यामुळे क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुनही अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम राहिला आहे. यासाठी साखर आयुक्तांकडून अनेक पर्याय समोर आले पण तोडगा काही निघाला नाही. राज्यात 200 साखर कारखान्यांच्या माध्यमातून गाळप केले जात होते. मात्र सगळा ऊस तोडला गेला नाही.
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! मान्सून महाराष्ट्रावर रुसला, जोरदार सुरुवातीनंतर घेतला ब्रेक..
आता 2 कारखाने सुरु असून 198 कारखान्यांची धुराडी बंद झाल्याचे साखर आय़ुक्तांनी स्पष्ट केले आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे. बीडमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. असे असताना साखर आयुक्तांनी कारखाने बंदची परवानगी दिलीच कशी असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. यामुळे आता राजू शेट्टी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दुप्पट उत्पन्न देणाऱ्या ऊसाच्या जातीला लवकरच मिळणार मान्यता
शाळा चालू झाल्या आणि कांद्याचे भाव वाढले, दर ५० रुपये किलोच्या पुढे जाण्याची शक्यता..
शेतकऱ्यांनी आपल्या शेतकरी नेत्याला दिली नवी कोरी फॉर्च्युनर भेट, राजू शेट्टींवर शेतकऱ्यांचे प्रेम अजूनही कायम
Share your comments