राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर असल्याने कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना प्रतिटन ४०० रूपये दुसरा हप्ता देण्याची मागणी कर्नाटक राज्याचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांचेकडे राजू शेट्टी यांनी केली.
विजापूर येथे ४०० रूपये दुसरा हप्ता, कर्नाटक राज्यातील वजनकाटे ॲानलाईन करणे व महाराष्ट्र सरकारप्रमाणे कर्नाटक सरकारनेही फसवणूक केलेल्या ऊसतोडणी मुकादमावर कारवाई करण्यासह विविध विषयावर बैठक झाली. यावेळी बैठकीत मंत्री Shivanand Patil यांनी कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक व वाहतूकदार यांच्या प्रश्नाबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक लावून तोडगा काढण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी गेल्या वर्षभरात साखरेला व ऊप पदार्थाला चांगला दर मिळाला आहे. कर्नाटक सरकारने गेल्या वर्षी इथेनॅाल उत्पादन करणा-या कारखान्यांनी प्रतिटन १५० रूपये व इतर कारखान्यांनी प्रतिटन १०० रूपये एफ. आर.पी पेक्षा जादा दर देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची अमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काटामारीचे प्रमाण जास्त आहे. राज्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे ॲानलाईन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
याबरोबरच कर्नाटक राज्यातील ऊस तोडणी मजूर मुकादमांनीही मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारने ज्यापध्दतीने नोडल ॲाफिसर म्हणून आय ए एस अधिका-याची नेमणूक करून तातडीने संबधित फसवणूक केलेल्या मुकादमावर गुन्हे दाखल करणेबाबत पोलिस प्रशासनाला आदेश देण्याची मागणी केली.
मंत्री शिवांनद पाटील शिष्टमंडळासोबत वरील मागण्याबाबत ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूकदारांसोबत सकारात्मक चर्चा करत राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कर्नाटक सरकारने गेल्या वर्षीच कारखान्यांना एफ.आर.पी पेक्षा जादा दर देण्याचे आदेश दिले आहेत.
लवकरच याबाबत न्यायालयातही सरकारच्या बाजूने निकाल लागणार असून त्याचीही अमलबाजावणी करण्यास कारखानदारांना भाग पाडणार असल्याचे सांगितले.
Share your comments