मुंबई: राज्यात साखर उत्पादन मागणीपेक्षा जास्त होत असल्याने साखर उद्योग अडचणीत येऊ नये यासाठी साखर उद्योजकांनी इथेनॉल प्रक्रियेवर भर द्यावा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.
महाराष्ट्रातील साखर उद्योगासमोर असलेल्या समस्या व त्यावरील उपायासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. देशमुख बोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, सहकार विभागाचे अतिरिक्त सचिव के. एच. गोविंदराज तसेच साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील साखर कारखाने अडचणीत येऊ नये, यासाठी साखर उद्योगाबरोबरच इथेनॉल प्रक्रियेवर अधिक भर द्यावा, यासाठी इथेनॉल प्रक्रियेसंदर्भातील सर्व सूचनांचा एकत्रित अहवाल दि. 10 जानेवारी 2019 पर्यंत द्यावा. त्यांनतर कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येतील, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
Share your comments