1. बातम्या

साखर कारखान्यांनी सॅनिटायझरचे उत्पादन करावे - केंद्र सरकार

देशासह राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. देशातील साधारण ३०० जणांना याची लागण झाली आहे. हा व्हायरस संसर्गजन्य असून सरकारने संचारबंदी लागू केली आहे.

KJ Staff
KJ Staff


देशासह राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. देशातून साधारण ३०० जणांना याची लागण झाली आहे. हा व्हायरस संसर्गजन्य असून सरकारने संचारबंदी लागू केली आहे. जेणेकरून हा आजार पसरवू नये. या व्हायरसवर अजून कोणतीच लस उपलब्ध झालेली नाही. परंतु हा व्हायरस आपल्याला लागू नये, यासाठी डॉक्टरांनी उपाय सुचविले आहेत. उपायाच्या मदतीने आपण या व्हायरसच्या धोक्यापासून दूर राहू शकतो.  बाहेरून आल्यानंतर किंवा कुठल्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर आपले हात धुवावेत. सॅनिटायझरचा वापर करावा, यासाठी सरकार जनजागृती करत आहे. सॅनिटायझरचा खप कमी पडू नये, यासाठी दारू बनिवण्याऱ्या कंपन्या आता सॅनिटायझर बनवत आहेत. दरम्यान देशात सॅनिटायझरचा पुरवठा कमी पडू नये, यासाठी साखर कारखान्यांनी सॅनिटायझरचे उत्पादन करावे,  असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

सॅनिटायझर तयार करण्यासाठी लागणारे इथिल अल्कोहोल, एक्सट्रा न्यूट्रल अल्कोबल, इथेनॉलचा वाजवी दरात पुरवठा करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.  यासाठी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, ऑल इंडिया डिस्टलरीज असोसिएशनने प्रयत्न करावेत,  असे या आदेशात म्हटले आहे.  केंद्र सरकारच्या आदेशाच्या संदर्भ घेऊन साखर आयुक्त सौरव राव यांनीही याबाबतचा आदेश कारखान्यांना दिला आहे. ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडील सुचनेनुसार इथिल अल्कोहोल, एक्सट्रा न्यूट्रल अल्कोहोल, इथेल या घटकांचा अत्यावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे.  या कायद्यातील बदलामुळे यांच्या किमती ५ मार्च २०२० च्या विक्री किमतीच्या पातळीवर आणण्यात आलेल्या आहेत.   सदर किमती ३० जूनपर्यंत ५ मार्चच्या  पातळीवर एक समान ठेवण्यात आलेल्या आहेत. 

ज्या साखरक कारखान्यांमध्ये आसवनी प्रकल्पामधून इथिल अल्कोहोल, एक्सट्रा न्यूट्रल अल्र्कोहोल, इथेनॉल यांचे उत्पादन घेतले जाते, त्या सर्व साखर कारखान्यांनी वरील उत्पादने विकताना १९ मार्च रोजी अत्यावश्यक वस्तू कायद्यामधील झालेल्या बदलानुसार ५ मार्च रोजीच्या किमती विचारत घ्याव्यात आणि त्याप्रमाणे त्यांची विक्री करावी, अन्यथा उपरोक्त कायद्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.  महाराष्ट्रातील साखर उद्योगाकडे हे घटक उपलब्ध असून सॅनिटायझर निर्मितीस त्वरित प्राधान्य दिल्यास मोठ्या प्रमाणात देशातील जनतेला दिलासा मिळणार आहे.

English Summary: Sugar factories should produce sanitizer - central government Published on: 24 March 2020, 02:21 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters